पुण्यात ‘या’ २० ठिकाणी होणार Electric Vehicle चार्जिंग स्टेशन

149

पुणे शहरातील नागरिकांना इलेक्ट्रीक वाहने चार्जिंग करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिका २० ठिकाणी खासगी एजन्सीद्वारे ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. प्रशासक राजेश पाटील यांनी आज या विषयाला मंजूरी दिली. स्वत: बांधा आणि संचलित करा या तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेला कोणताही खर्च करावा लागणार नसून महापालिकेकडून संबंधित एजन्सीला केवळ जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. इलेक्ट्रीक वाहनांचा अधिक वापर होण्यास प्रोत्साहन मिळावे याकरिता महापालिकेने पुढाकार घेतला असून प्रदूषणमुक्त शहरासाठी हे महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

(हेही वाचा – SpiceJet मध्ये 18 दिवसांत 8 वेळा बिघाड, DGCA ने बजावली कारणे दाखवा नोटीस)

महाराष्ट्र शासनाच्या “माझी वसुंधरा” धोरणाअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर अपारंपारिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमास चालना मिळण्याकरीता विविध उपाययोजना राबविणे तसेच नुतनीकरणक्षम उर्जा निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्याकरीता नवीन आणि अक्षय उर्जा मंत्रालयाच्या विविध कार्यक्रमांच्या आणि धोरणांच्या उपलब्धतेवर आधारित नविकरणीय उर्जा प्रकल्प विकसित करण्याचे महापालिकेच्या विचाराधीन आहे. त्याअनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना इलेक्ट्रीक वाहने चार्जिंग करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.  यासाठी महापालिकेमार्फत ईव्ही चार्जिंग स्टेशन ७ वर्षे कालावधीकरिता २० ठिकाणी वाजवी दराने विभिन्न एजन्सींकडून स्वत: बांधा आणि संचलित करा (बिल्ड ऑपरेट अॅन्ड ओन) मॉडेलवर इलेक्ट्रीक वाहने चार्जिंग सुविधा वाजवी दराने उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. या एजन्सींना महापालिकेकडून फक्त जागा उपलब्ध करुन देण्यात येईल.

या ठिकाणी उभारणार चार्जिंग स्टेशन्स

पुणे महापालिका पार्कींगच्या जागेमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी जागा निश्चिती करण्यात आली असून यामध्ये पिंपरी येथील महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात, पिंपरीतील सीट्रस हॉटेल जवळ, दुर्गादेवी टेकडी निगडी, वाहतुकनगरी, बर्ड व्हॅली संभाजीनगर, बजाज अॅटो जवळ, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल भोसरी, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम नेहरुनगर, मलनि:सारण केंद्र चिखली, राधास्वामी रोड चिखली, डॉ बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलाव कासारवाडी, निसर्ग निर्माण सोसायटी रिलायन्स मार्ट जवळ कोकणे चौक पिंपळे सौदागर, विंटेज सोसायटी पिंपळे सौदागर, योगा पार्क विबग्योर शाळा पिंपळे सौदागर, राजमाता जिजामाता उद्यान पिंपळेगुरव, वंडर कार्स निसर्ग निर्माण सोसायटी कोकणे चौक पिंपळे सौदागर, भक्ती शक्ती बस टर्मिनल निगडी, एच ए कंपनी सब वे जवळ, सीएमई सीमाभिंतीलगत फुगेवाडी आणि संततुकाराम मेट्रो स्टेशनच्या चौथ्या प्रवेशद्वाराजवळ ईव्ही चार्जिंगसाठी जागा निश्चिती करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.