नवले पुलाजवळ अपघातांची मालिका सुरूच; टँकरची तीन वाहनांना धडक

133

मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुल परिसरातील भूमकर पुलावर अपघातांची मालिका सुरूच आहे. आज, शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तीन वाहनाना या टँकरने धडकले. सुदैवाने या अपघातात कोणातीही जीवितहानी झाली नसली तरी यामध्ये दोन कारचे मोठे नुकसान झाले असून एका टेम्पो ट्रॅव्हलरचे किरकोळ नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातानंतर टँकरचालक टँकरसह पसार होत असताना नागरिकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि सिंहगड वाहतूक विभाग, राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग व्हॅन घटनास्थळी दाखल झाले आहे.

(हेही वाचा – “सावधान! पुढे…”; नवले पुलावरील वाढत्या अपघातानंतर पुणेकरांच्या ‘पुणेरी पाट्या’)

पुण्यातील नवले पुलावर गेल्या रविवारपासून अपघातांची मालिका सुरूच आहे. रविवारी त्याच परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात होऊन जवळपास ४० हून अधिक वाहनांचे नुकसान झाले तर १२-१३ प्रवासी गंभीर जखमी झाले होते, तर एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. यानंतर मंगळवारी दोन अपघात झाले यामध्ये ५ वाहनांचे नुकसान झाले होते. तर बुधवारी देखील अपघात होऊन तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.