दोन दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढले धावडे परिसरातील एका सोसायटीच्या आवारात बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली होती. याआधी सुद्धा पुण्यात बिबट्याचा वावर होता. अशातच आता पुणे शहरातील वारजे परिसरात बिबट्या आढळल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
( हेही वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सातवा दिवस! सामान्य जनतेची गैरसोय)
पुण्यात वारजे येथील न्यू अहिरे गावात एका नव्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये बिबट्या शिरला. सकाळी काही लोकांना बिबट्या दिसला आणि एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. वन विभागाला सुद्धा यासंदर्भात कळवण्यात आले. अचानक बिबट्या दिसल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
वनविभागाची रेस्क्यू टीम पोलिसांसोबत घटनास्थळी दाखल झाली. यानंतर तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्याला दार्ट मारून बेशुद्ध करण्यात आले आणि बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले.
बिबट्या अखेर जेरबंद, पहा व्हिडिओ
https://twitter.com/datta_lawande96/status/1637667852600877058
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शहरी भागात बिबट्या आल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती तसेच बिबट्याला जेरबंद करताना स्थानिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
Join Our WhatsApp Community