राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी इस्लामिक स्टेट-खोरासान प्रांताशी (आयएसकेपी) संबंधित प्रकरणाच्या संदर्भात पुणे येथील रहिवासी तल्हा खान याच्या घरावर छापे टाकले आहेत.
एनआयएने तपास केला सुरु
सुरुवातीला, जहांझैब सामी वानी आणि हीना बशीर बेग नावाच्या काश्मिरी जोडप्याला अटक करून, दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने 8 मार्च 2020 रोजी गुन्हा दाखल केला होता. नंतर NIA ने तपास हाती घेतला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.
( हेही वाचा: International Women’s Day: महिलांनीच महिलांना विचारावेत ‘हे’ प्रश्न! )
या प्रकरणात केली अटक
जहानझीब वानी आणि हिना बेग हे पुण्यातील व्यायामशाळा चालवणाऱ्या खत्री तसंच सादिया यांच्या संपर्कात असल्याचं समोर आलं होतं. एनआयएने खत्रीवर भारतात हिंसक दहशतवादी हल्ले घडवण्यास मदत केल्याचा आरोप केला होता, तर सादियावर भारतात IS चे कॅडर तयार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. याशिवाय वानी आणि बेग हे हैदराबादच्या अब्दुल्ला बासितच्या संपर्कात होते, ज्याला ISIS च्या अबू धाबी मॉड्यूलशी संबंधित प्रकरणात अटक करण्यात आली होती.
NIA Conducts Searches in Pune in ISKP Case (RC 11/2020/NIA/DLI) pic.twitter.com/ojy6GtuRmm
— NIA India (@NIA_India) March 7, 2022
आरोपपत्र दाखल
तपासादरम्यान, अब्दुल्ला बासिथ, सादिया अन्वर शेख, नबील सिद्दीक खत्री आणि अब्दुर रहमान उर्फ डॉ ब्रेव्ह या चार आरोपींना अटक करण्यात आली. भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी समविचारी लोकांचा पाठिंबा मिळवून आयएसआयएसच्या विचारसरणीचा प्रचार करण्याचा कट रचणे, आयएसआयएससाठी काम करण्यासाठी सेल स्थापन करणे, निधी उभारणे, शस्त्रे गोळा करणे, या प्रकरणी एनआयएने आतापर्यंत सहा आरोपींवर आरोपपत्र दाखल केले आहे.
Join Our WhatsApp Community