Pune : पुणेकरांची ‘पाणी कपातीची’ चिंता तूर्तास मिटली

एकीकडे राज्यात उष्माघात,अवकाळी पावसाचं संकट असतांना दुसरीकडे नागरिकांना पाणी कपातीसारख्या प्रश्नांना तोंड द्यावं लागत आहे. पावसाळा सुरु होण्यास अजून बरेच दिवस बाकी आहेत. त्यामुळे पाणी कपातीचा प्रश्न इतक्यत सुटेल असं वाटत नाही.

215
Pune water cut
Pune : पुणेकरांची 'पाणी कपातीची' चिंता तूर्तास मिटली

पुणेकरांना (Pune) काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. त्यानुसार सध्या पुणेकरांना (Pune) सतावत असणाऱ्या पाणी कपातीच्या (Water Cut) संकटापासून तूर्तास मुक्ती मिळाली आहे. पुणे आणि ग्रामीण परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत येत्या जुलै महिन्यापर्यंतचाच साठा शिल्लक आहे, त्यामुळे पुणेकरांना (Pune) पाणी कपात सहन करावी लागणार का? असा प्रश्न सर्वांना पडला होता. याच पार्श्वभूमीवर पुणे शहराचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक बैठक घेतली. त्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आता पुणेकरांना १५ मे पर्यंत कुठल्याही प्रकारे पाणी कपातीला सामोरं जावं लागणार नाही.

(हेही वाचाIT Sector : तरूणांनो लक्ष द्या! आयटी क्षेत्रात नोकऱ्यांची घट)

चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक

बुधवार २६ एप्रिल रोजी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी येत्या १५ मेपर्यंत पुणेकरांची पाणीकपात बंद केली आहे. १५ मेनंतर पुन्हा एकदा संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन पाणीकपातीचा निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांच्यासोबत पुण्यातील काही आमदार देखील उपस्थित होते.

हेही पहा

चारही धरणात एकूण ११.५२ टीएमसी इतका पाणीसाठा

माहितीनुसार, खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या चारही धरणात एकूण ११.५२ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी कपात करावी लागण्याची शक्यता होती. याच विषयावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यंदाच्या पावसाच्या अंदाज पाहता धरणातील पाणीबचत करणे आवश्यक आहे. तथापि, पुणे शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात पुढच्या काही दिवसांसाठी पाणीपुरवठा विस्कळीत होतो. त्यामुळे बऱ्याच नागरिकांचे हाल होतात. म्हणूनच तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने येत्या आठ दिवसात उपाययोजना सादर कराव्यात, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.