व्हाया सीरिया ते जम्मू-काश्मीर असंं होत होतं टेरर फंडिंग!

61

पुणे पोलिसाकडून एका गुन्ह्याचा तपास करीत असताना या गुन्ह्याचे कनेक्शन थेट टेरर फंडिंगपर्यंत येऊन ठेपले होते. पुण्यातून ही टेरर फंडिंग जम्मू काश्मीरमध्ये करण्यात येत होती. ही टेरर फंडिंग थेट जम्मू काश्मीर येथे न करता दोन देशातून व्हाया-व्हाया करण्यात येत होती अशी माहिती पुण्याच्या एसआयटी ने केलेल्या तपासात समोर आले होते. पुरते फंडिंग नसल्याचे कारण पुढे करून या प्रकरणाचा पुढील तपास मंदावला होता. पुण्याच्या कोथरूड पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी ऍडमिशन रॅकेटचा पर्दाफाश केला होता, या रॅकेटच कनेक्शन अंडरवर्ल्ड पासून ‘टेरर फंडिंग’ पर्यंत येऊन पोहचले होते.

… म्हणून एसआयटीची स्थापना करण्यात आली

पुण्यात ऍडमिशनच्या नावा खाली पैसे उकळणात येत होते आणि ऍडमिशन मधून आलेला पैसा टेरर फंडिंगसाठी पाठवला जात होता. प्रकरण साधेसुधे नव्हते तर त्याचे थेट कनेक्शन अंडरवर्ल्डशी असल्याचे तसेच जोखमीचे आणि तितकेच गुंतागुंतीचे असल्यामुळे या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापन करण्यात आली होती. पोलीस उपायुक्त दर्जाचा अधिकारी या एसआयटीचा प्रमुख होता. या तपासाचे रिपोटिंग पोलीस उपायुक्त थेट पोलीस महासंचालक यांना करीत होते, ९ अधिकाऱ्याच्या या एसआयटीने ४ ते ५ महिन्यात २५ लाख पेक्षा अधिक सिडीआर (फोन कॉल डाटा) तपासला होता, ५०० जणांचे पडताळणी करून ५० बँक खाती तपासण्यात आली होती.

एसआयटीच्या अहवालातून काय आले समोर?

चौकशी दरम्यान असे आढळून आलं की इकडे पैसा साठवला जातो आणि तो दहशतवादी कारवायासाठी वापरला जातो असे २३ फोन नंबर रेकॉर्डवर आले जे थेट जम्मू काश्मीरशी संशयितरीत्या कनेक्टड आहेत. गोळा झालेला हा पैसा पुण्यातून सीरिया आणि जॉर्डन या देशांमार्गे जम्मू काश्मीरला वळवला जात होता. मात्र हे करण्यासाठी शासकीय यंत्रणेतील काही लोकांची मदत घेण्यात आली होती. ज्यात काही वरिष्ठ पोलीस अधिकारी, काही खाजगी बँका आणि राजकीय व्यक्तीचे पीए केंद्र आणि राज्यातील राजकीय व्यक्ती यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली गेली होती असे एसआयटीने तयार केलेल्या अहवालात नमूद केले आहे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.