पुणे रेल्वे स्टेशनवर बाॅम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ उडाली होती. खबरदारी म्हणून 1 आणि 2 प्लॅटफाॅर्म पूर्णपणे रिकामा करण्यात आला होता. पण पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गु्प्ता यांनी आढळलेली वस्तू ही बाॅम्बसदृश्य नसल्याचे सुरुवातील म्हटले होते. मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ही वस्तू हस्तगत केली. त्यानंतर एका खुल्या मैदानात ही वस्तू आणण्यात आली होती. बाॅम्बनाशक पथकाकडून ही वस्तू खुल्या मैदानात ठेवण्यात आली होती. त्यानंतर त्या वस्तूचा स्फोट घडवून आणला आणि ही वस्तू निकामी केल्याचे दिसून आले.
वस्तूबाबत संभ्रम कायम
दरम्यान, ही वस्तू बाॅम्बसृ्श्य नव्हती, यात जिलेटिन कांड्या नव्हत्या, तर मग बाॅम्ब पथकाने ही वस्तू निकामी करण्याचे कारण काय हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. आता पोलिसांकडून याबाबत अधिक तपास केला जात आहे. मात्र सध्या तरी ही वस्तू निकामी करण्यात आली आहे.
( हेही वाचा: देशमुखांना दिलासा नाहीच; खासगी ऐवजी जे.जे. मध्येच करावे लागणार उपचार )
कुठे सापडली वस्तू
शुक्रवारी सकाळी 10:30 च्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकात एक बाॅम्बसदृश्य वस्तू आढळल्याचा संथय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी संपूर्ण रेल्वे स्टेशन पिंजून काढले होते. प्लॅटफाॅर्म नंबर एक आणि दोन रिकामी करण्यात आले होते तसेच बाॅब्मनाशक पथकही तैनात करण्यात आले होते.
Join Our WhatsApp Community