पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर!

पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेसचे तिकीट १५ जुलैपासून काढता येणार

191

पुणे-सोलापूर इंटरसिटी सुपरफास्ट एक्स्प्रेस येत्या १८ जुलैपासून पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे विभागातर्फे देण्यात आली होती. या एक्स्प्रेसने ज्या प्रवाशांना प्रवास करायचा आहे. त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. ती म्हणजे पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांना १५ जुलैपासून रेल्वे स्थानकावर अथवा ऑनलाइन आरक्षण करता येणार आहे.

(हेही वाचा – “…तर शिंदेच्या बाणापुढे ‘त्यांचा’ बाण टिकू शकणार नाही”)

१८ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता १२१६९ पुणे – सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेस पुणे रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी दीडच्या सुमारास सोलापूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. तर १२१७० सोलापूर – पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस सोलापूर रेल्वे स्थानकावरून दुपारी दोन वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. दौंड, जेऊर आणि कुर्डुवाडी या रेल्वे स्थानकावर ही एक्स्प्रेस थांबेल अशी माहिती पुणे रेल्वे विभागातर्फे देण्यात आली.

अडीच वर्षांनंतर ‘इंटरसिटी एक्स्प्रेस’ पुन्हा धावणार

दोन वर्षांपूर्वी कोरोना संसर्ग काळातील लॉकडाऊनमध्ये सर्व रेल्वे बंद केल्या होत्या. त्यात पुणे सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेसचाही समावेश होता. आता सर्व गाड्या सुरू झाल्या तरी सोलापूर विभागातील इंटरसिटी सुरू नव्हती. प्रवासी संघटनांनी गाडी सुरू करण्याची वारंवार मागणी केली होती. मात्र याबाबत मौन साधत रेल्वे मंडळाने लवकरच सुरू करू, असे मोघम उत्तर देत वेळ मारून नेण्यात धन्यता मानली होती. बुधवारी रेल्वेगाडी सुरू करत असल्याचे पत्र पाठवून रेल्वे प्रशासनाने सर्वांना आनंदाचा धक्का दिला आहे. एकूण २८ महिने ही गाडी बंद करण्यात आली होती. त्यामुळे अडीच वर्षांनंतर ‘पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस’ पुन्हा धावणार आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.