पुणेकर कधी काय करतील याचा काही नेम नाही. कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पुणे शहर नेहमीच चर्चेत असते. पुणे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पुण्यात आता घरात मांजर पाळण्यासाठी पुणे महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे.
घरात मांजर पाळायचे असेल तर आता त्यासाठी पुणे महापालिकेचा परवाना घ्यावा लागणार आहे. आरोग्य विभागाच्या या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. पुढील आठ दिवसांत परवान्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवली जाणार आहे. महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार मांजर, कुत्रा, घोडे अशा पाळीव प्राण्यांना घरी ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करुन त्यासाठी रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे.
( हेही वाचा: पेणनजीक सापडला डमी बॉम्ब; चार तासांच्या प्रयत्नानंतर निकामी करण्यात यश )
ही कागदपत्रे बंधनकारक
मांजराची नोंदणी करण्यासाठी वर्षाला 50 रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहे. तसेच रहिवासी पुरावा, लसीकरण प्रमाणपत्र आणि मांजराचा फोटो ही कागदपत्रे बंधनकारक असणार आहेत. तसेच, दरवर्षी त्या परवान्याचे नूतनीकरण करुन 50 रुपये परवाना शुल्काशिवाय अतिरिक्त 25 रुपये आकारले जाणार आहे.
Join Our WhatsApp Community