सांस्कृतिक शहरातील धक्कादायक प्रकार! फी न भरल्याने मुलाला केली ही शिक्षा

134

शाळेची फी भरली नाही म्हणून मुलाला ३ तास एकटे बसवण्यात आले हा धक्कादायक प्रकार डोंबिवलीतील ग्रीन इंग्लिश शाळेत घडल्याचे समोर आले आहे. परंतु मुलाला कोंडून ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप पालकांकडून केला जात आहे. याचमुळे मुलाला चक्कर आली असेही पालकांकडून सांगण्यात येत आहे. परंतु त्याला एकटे वेगळ्या वर्गात बसवण्यात आले होते असे शालेय व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

( हेही वाचा  : बेस्टच्या सामायिक कार्डकडे प्रवाशांनी फिरवली पाठ )

३ तास एकटे बसवले

चंदन गिरी हा डोंबिवलीतील ग्रीन इंग्लिश शाळेत इयत्ता १० वी शिक्षण घेत आहे. नेहमीप्रमाणे शाळेत हजर झाल्यावर पहिली तासिका संपल्यावर पालकांना बोलवून घे असे सांगितले गेले. त्यानंतर जवळपास तीन तास चंदन एकटा बसून होता. घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे वडील फी कसे भरणार या विचाराने चंदनला चक्कर आली, शाळेत प्राथमिक उपचार सुरू असताना पालक दाखल झाले आणि त्याला तातडीने पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शाळेने सर्व आरोप फेटाळले

चंदनचे वडील मनोज गिरी यांनी आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आम्ही फी भरू वेळेत भरू शकत नाही परंतु जसे पैसे येतील तसे भरू असे शालेय व्यवस्थापनाला सांगितले होते. परंतु या आरोपांवर उत्तर म्हणून दोन वर्ष फी भरली नव्हती तरीही आम्ही कधीही फी भरा असा तगादा लावला नाही असे शालेय व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. तसेच आम्ही मुलाला कोंडून ठेवले नाही त्याला एकटे बसवले होते असे सांगत शाळेने सर्व आरोप फेटाळले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.