पंजाबी गायक दलेर मेहंदीला जामीन, पटियाला न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती

मानवी तस्करी प्रकरणी तुरुंगात असलेला बॉलिवूडचा प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी याला हरियाणा उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. दलेर मेहंदीला १९ वर्षे जुन्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. यामुळे दलेर मेहंदीला तुरूंगात जावे लागले होते. दरम्यान, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने गायक दलेरला दिलासा दिला आहे.

(हेही वाचा – वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत उदय सामंतांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “केवळ चर्चा, लेखी व्यवहार…”)

पटियाला उच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देताना उच्च न्यायालयाने दलेर मेहंदीचा जामीन अर्ज मंजूर केला आणि त्याला जामीन दिला. 14 जुलै रोजी दलेर मेहंदीला पटियाला पोलिसांनी अटक केली होती. गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या दलेर मेहंदीला अखेर दिलासा मिळाला आहे.

19 वर्ष जुन्या मानवी तस्करी प्रकरणात पटियालाच्या ट्रायल कोर्टाने 2018 साली दलेर मेहंदीला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. दलेर मेहंदीला त्यावेळी जामीन मिळाला असला तरी दलेर मेहंदीने अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पटियाला यांच्यासमोर अपील दाखल करून आव्हान दिले होते. चार वर्षे अपीलावर सुनावणी केल्यानंतर न्यायालयाने 14 जुलै 2022 रोजी दलेर मेहंदीचे अपील फेटाळून लावत शिक्षा कायम ठेवली. अपील फेटाळल्यानंतर दलेर मेहंदी यांनी उच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करून आव्हान दिले, त्यावर आज सुनावणी झाली आणि न्यायालयाने दलेर मेहंदी यांना दिलासा दिला आहे.

कोण आहे दलेर मेहंदी?

  • 1995 मध्ये दलेर मेहंदीचा बोलो तारारारा हा पहिला अल्बम चांगलाच लोकप्रिय झाला होता.
  • 1998 मध्ये दलेर मेहंदीच्या तुनक तून या अल्बनला देखील लोकांनी प्रचंड पसंती दिली
  • बिहारच्या पाटण्यात 18 ऑगस्ट 1967 साली दलेर मेहंदीचा जन्म झाला.
  • दलेर मेहंदी हे गायक शिवाय गीतकार, लेखक आणि निर्माता देखील आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here