भारतातील सर्वात जुनी रेल्वे गाडी माहिती आहे का?

122

भारतीय रेल्वेचे जाळे संपूर्ण देशभरात पसरले आहे. त्यामुळे कुठेही प्रवास करायचा असेल तर भारतातील लोक सर्वप्रथम रेल्वेला प्राधान्य देतात. भारतीय रेल्वे त्यांच्या सगळ्या जुन्या गाड्यांची देखभाल करते. आपण अशाच एका रेल्वेची माहिती घेणार आहोत. सर्वात जुनी रेल्वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई ते हावडा धावणाऱ्या पंजाब मेलने १ जूनला ११० व्या वर्षांत पदार्पण केले. याची सुरूवात १ जून १९१२ रोजी झाली. तेव्हापासून आजतागायत ही रेल्वे सेवा देत आहे.

( हेही वाचा : Train मध्ये तुम्ही सामान विसरलात तर रेल्वे त्याचे पुढे काय करते? जाणून घ्या…)

फाळणीपूर्व काळात सर्वात वेगवान रेल्वे गाडी 

पंजाब मेल आजही ताशी ११० किलोमीटर वेगाने धावते. देशावर इंग्रजांचे राज्य असताना याची सुरूवात झाली. ही रेल्वे आधी बॅलार्ड पायरे मोल स्टेशनवरून पेशावरपर्यंत धावत असे. त्यावेळी या मार्गावर ही एकमेव रेल्वे धावत होती. पेशावरहून मुंबईला लोकांची ने-आण करण्यासाठी या रेल्वेचा खूप फायदा झाला. मात्र त्यावेळी या ट्रेनचे नाव पंजाब लिमिटेड होते, त्यानंतर या रेल्वेचे नाव बदलून पंजाब मेल करण्यात आले.

( हेही वाचा : दुसरे महायुद्ध, मुंबईचा डबेवाला ते ऑनलाइन ऑर्डर; Food वितरण प्रणालीचा रंजक इतिहास)

New Project 24 1

१९३० नंतर ही ट्रेन भारतीय नागरिकांना खुली झाली तत्पूर्वी या रेल्वेतून केवळ इंग्रज अधिकारी व कर्मचारी प्रवास करायचे. १९३० नंतर ही ट्रेन ४७ तासात २ हजार ४९६ किलोमीटर अंतर कापायची. सुरूवातीला सहापैकी तीन डब्यांमध्ये ९६ प्रवासी बसायचे. उर्वरित तीन डबे टपाल, गार्ड आणि पार्सलसाठी होते. फाळणीपूर्व काळात पंजाब लिमिटेड ही सर्वात वेगवान गाडी होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.