Purnima In Marathi : जाणून घ्या ’पौर्णिमा’बद्दल १० महत्त्वाची तथ्ये

1757
Purnima In Marathi : जाणून घ्या ’पौर्णिमा’बद्दल १० महत्त्वाची तथ्ये
Purnima In Marathi : जाणून घ्या ’पौर्णिमा’बद्दल १० महत्त्वाची तथ्ये

हिंदु धर्मात पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे. (Purnima In Marathi) या दिवशी हिंदू विविध उपाय अथवा गोष्टी करतात. जेव्हा संपूर्ण चंद्र दिसतो, तो दिवस पौर्णिमा आहे, असे मानले जाते. या दिवशी चंद्राची पूजा केली जाते, चंद्राचे दर्शन घेतले जाते. पौर्णिमा ही १५ वी तिथी आहे.

१. भगवान विष्णूची आराधना

भारताच्या काही भागांमध्ये पौर्णिमा ही कार्तिक पौर्णिमा या उत्सवाशी संबंधित आहे. हा सण भगवान विष्णूच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. वैष्णवांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी ते भक्तीगीत म्हणतात आणि संध्याकाळी पारंपरिक पद्धतीने पूजा करतात.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवला)

२. महिला आणि पौर्णिमा

हिंदू महिला आपल्या पतीच्या, मुलांच्या आणि एकंदर कुटुंबाच्या कल्याणासाठी उपवास करतात, उपासना करतात. हिंदू धर्मात महिलांना कुटुंबाचं आधारस्थान मानलं गेलं आहे. तसेच ती कुटुंबाची आधार असल्यामुळे तिच्या प्रकृतीसाठी देखील पौर्णिमेत करण्यात येणार्‍या उपासना महत्त्वाच्या आहेत. (Purnima In Marathi)

३. शेतकर्‍यांचा सण

भारताच्या काही भागांत पौर्णिमा हा पीक कापणीचा सण म्हणून देखील साजरा केला जातो. शेतकरी चंद्राकडे त्यांच्या शेतीच्या वृद्धीसाठी प्रार्थना करतात. आपल्या शेतात हा सण साजरा करतात आणि चंद्रदेवाला नैवेद्य म्हणून गोड पदार्थ अर्पण करतात.

४. ज्योतिषशास्त्रातील महत्व

ज्योतिषशास्त्रामध्ये देखील पौर्णिमेला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही दिवसांचा ज्योतिषशास्त्रात खूप गहन विचार करण्यात आला आहे. ज्योतिषशस्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी जन्मलेल्या बालकाची स्थिती चांगली असते. या दिवशी जन्मलेली व्यक्ती विज्ञान, तंत्रज्ञान आणि विकास इत्यादी क्षेत्रात स्वतःचे नाव कमावू शकते. या व्यक्तीकडे सद्गुण आणि नेतृत्व देखील असते.

५. मन आणि शरीरावर परिणाम

पौर्णिमेमुळे मन आणि शरीर यांच्यात एक सुसंवाद घडवला जातो. या दिवशी मन आणी शरीरामध्ये संतुलन निर्माण करण्यास मदत होते. या संतुलनामुळे शरीर निरोगी राहते आणि मन स्थिर राहते. या दिवशी सकारात्मक विचार करण्यावर भर दिला जातो. आणि चांगल्या कामाची सुरुवात देखील तुम्ही करू शकता. (Purnima In Marathi)

६. मानसिक स्थिती

चंद्रामुळे आपल्या मनावर प्रभाव पडतो असं मानलं जातं. अगदी आपल्या भोवती असलेल्या निसर्गाचा देखील आपल्या मनावर परिणाम होतो. जग खूपच गूढ आहे. अजूनही आपण विश्वाला व्यवस्थित जाणून घेतलेलं नाही. आपलं मन स्थिर व्हावं म्हणून पौर्णिमेच्या दिवशी सकारात्मक विचार करावा, उपासना कराव्यात. वादविवाद टाळावेत. या सर्व गोष्टी अमावास्येला देखील लागू पडतात.

७. कोणत्या देवाची पूजा केली जाते?

पौर्णिमेला विविध देवतांची पूजा केली जाते. भगवान विष्णू, महादेव यांची उपासन करणे चांगले असल्याचे मानण्यात आले आहे. त्याचबरोबर धनप्राप्तीसाठी लक्ष्मी मातेची उपासना देखील सांगितलेली आहे. आषाढ पौर्णिमा गुरु पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी आपल्या गुरुंना वंदन केले जाते. तसेच ज्येष्ठ पौर्णिमा वट पौर्णिमा म्हणूनही साजरी केली जाते. या दिवशी महिला पतीच्या दीर्घ आरोग्यासाठी उपवास करतात व वडाच्या झाडाची पूजा करतात. वैशाख पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. श्रावणातल्या पौर्णिमेला आपण रक्षा बंधन साजरा करतो. थोडक्यात विविध पौर्णिमेला विविध देवतांची उपासना केली जाते. (Purnima In Marathi)

८. पौर्णिमेचे प्रकार कोणकोणते आहेत?

पौष पौर्णिमा

माघ पौर्णिमा

फाल्गुन पौर्णिमा

चैत्र पौर्णिमा

वैशाख पौर्णिमा

ज्येष्ठ पौर्णिमा

आषाढ पौर्णिमा

श्रावण पौर्णिमा

भाद्रपद पौर्णिमा

अश्विन पौर्णिमा

कार्तिक पौर्णिमा

मार्गशीर्ष पौर्णिमा (Purnima In Marathi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.