ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ कालवश; सात दशके सांभाळले सिंहासन

इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले आहे. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेताल. मागील अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. डाॅक्टरांनी त्यांना वैद्यकीय निरीक्षणात ठेवले होते. इंग्लंडच्या पंतप्रधान लिड ट्रस यांनी ट्वीट करत त्यांच्या प्रकृतीबाबतचे अपडेट दिले होते. महाराणी या बालमोरमध्ये होत्या. त्यांच्या प्रकृतीबाबतचे वृ्त्त समजताच त्यांचा मुलगा प्रिन्स चार्ल्स आणि नातू प्रिन्स विल्यम रवाना झाले आहेत.

शाही परिवाराने ट्विट करत निधनाचे वृत्त दिले

शाही राजघराण्याच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनाचे वृत्त देण्यात आले . गुरुवारी दुपारी बालमोरमध्ये त्यांचे निधन झाले. लवकरच शाही परिवार लंडनमध्ये दाखल होणार आहे.

( हेही वाचा: नितीश कुमार यांनी धोंड्यावर पाय आपटला आहे )

पंतप्रधानांनी ट्वीट करत व्यक्त केला शोक 

21 एप्रिल 1926 झाली लंडनमध्ये महाराणी एलिझाबेथ द्विताय यांचा जन्म झाला. एलिझाबेथ यांचे वडील जाॅर्ज यांचे 1952 मध्ये निधन झाले. त्यानंतर एलिझाबेथ यांना 1952 मध्ये ब्रिटनची महाराणी म्हणून घोषित करण्यात आल्या. त्यानंतर त्यांनी सलग सात दशके ब्रिटनची महाराणी म्हणून कामकाज पाहिले. एलिझाबेथ या जगात सर्वाधिक काळ सत्ता हाकणा-या महाराणी आहेत. एलिझाबेथ यांचा विवाह प्रिन्स फिलिप यांच्यासोबत 1947 मध्ये झाला. मागील वर्षी, 9 एप्रिल 2021 मध्ये वयाच्या 99 व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते.

एलिझाबेथ यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. मात्र, त्यांना वयोमानाप्रमाणे इतर आजारांचा सामना करावा लागत होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here