मुंबईकरांनो… आता पोलीस आयुक्तांना थेट विचारा तुमचे प्रश्न!

155

मुंबई पोलिसांच्या इतिहासात प्रथमच नागरिकांच्या प्रश्नाला मुंबईचे पोलीस आयुक्त थेट उत्तरे देतील. मात्र तुमचे प्रश्न हे कायदा व सुवस्था अथवा नागरिक सुरक्षा आणि सायबर सुरक्षेला धरून असायला हवेत. महाराष्ट्र पोलिसांचे अधिकृत युट्यूब चॅनेल असलेल्या ‘महाराष्ट्र पोलीस इन्फॉर्मेशन नेटवर्क’च्या फेसबुक लाईव्ह आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बुधवारी सायंकाळी ७ वाजता मुंबईकरांना आपल्या समस्या पोलीस आयुक्तांपुढे थेट मांडता येणार आहेत. मुंबई पोलीस आयुक्त प्रत्येकाच्या प्रश्नाचे या माध्यमातून उत्तरे देतील, असे मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटवर असलेल्या एका टीझरमध्ये म्हटले आहे.

नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबई पोलीस दलाचा पदभार सांभाळल्यानंतर कुठल्या न कुठल्या माध्यमातून ते मुंबईकराच्या संपर्कात आले आहेत. पांडे यांच्याकडे जास्त कालावधी नसला तरी, आहे त्या कालावधीत मुंबईसाठी काही तरी करायची इच्छा पांडे यांची आहे. पोलीस आयुक्त पांडे यांनी ‘संडे स्ट्रीट’ हा कार्यक्रम राबवला आहे. तसेच प्रत्येक रविवारी ‘फेसबुक लाईव्ह’ करून पोलीस आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर उपाय देखील सूचवले. नागरिकांच्या तक्रारी लिहून न घेणाऱ्या पोलिसांवर कारवाई असो अथवा वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पांडे यांनी दिले आहेत.

(हेही वाचा – ठाकरे सरकार फक्त झोपा काढतंय अन् टाईमपास करतंय, फडणवीसांचा हल्लाबोल)

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.