आज २८ मे म्हणजे स्वा. विनायक दामोदर सावरकरांची (Veer Savarkar) जयंती. सावरकरांचा जन्म भगूर येथे २८ मे १८८३ रोजी झाला. सावरकर हे प्रमुख भारतीय क्रांतिकारक होते आणि इंग्रजांनी त्यांना त्या काळातील सर्वात मोठा आणि खतरनाक शत्रू मानले होते. म्हणूनच अंदमानमध्ये असताना त्यांच्या गळ्यात “डी” म्हणजेच डेंजर असा बिल्ला घातला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सावरकर हे असे पुढारी होते ज्यांनी हिंदुंचे रक्षण केले. जर सावरकर जन्माला आले नसते तर देशाची अनेक शकले उडाली असती. सावरकरांना (Veer Savarkar) हिंदू संघटक म्हणवून घ्यायला अधिक पसंत होतं. हिंदू आणि सावरकर हे समानार्थी शब्द आहेत, असेच म्हणावे लागेल. आज सगळीकडे सावरकरांची चर्चा होत आहे. रणदीप हुड्डा यांनी त्यांच्यावर चित्रपट काढून पुन्हा एकदा मशाल पेटवली आहे. हिंदुत्वाचं ठिणगी पुन्हा एकदा चेतवली आहे.
आज आपण सावरकरांचे हिंदुत्वावरील विचार जाणून घेणार आहोत. चला तर पाहुयात स्वा. सावरकरांचे हिंदुत्व यावरील कोट्स…
- सिंधुस्थान ही ज्याचि केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू.
- काही झाले तरी बुद्धिवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदुधर्म होय!
- हिंदुत्व हा एक शब्द नव्हे, तो इतिहास आहे.
- आमचे एकजीवन आज ज्या एकाच शब्दात नवीन व्याख्येप्रमाणे व्यक्तविता येते तो अनन्य शब्द आहे हिंदू!
- सिंधू ह्या शब्दाने व्यक्त होणारी कल्पना राष्ट्रवाचक आहे, केवळ भौगोलिक नाही.
- शीखांचे अमृतसर, वैदिकांची काशी, बौद्धांची गया ही सारी आम्हा हिंदूंची सामायिक नि सारखीच पुण्यक्षेत्रे होय.
- हिंदुराष्ट्र हे एकच राष्ट्र असे आहे की त्याने पूर्ण निःश्रेयसाच्या आधारावरील निर्दोष अभ्युदय हे आले ध्येय स्वीकारले आहे.
- आपले सण, उत्सव, संस्कार व आचार समान आहेत. हिंदू कोठेही असो मग तो शीख, जैन, ब्राह्मण वा पंचम असो, तो दसरा, दिवाळी, रक्षाबंधन आणि होळी यांचे स्वागत करतो.
- वस्तुतः जो समाज देशात बहुसंख्य असतो त्यांचाच तो देश मानला जाण्याची प्रथा सर्व जगात आहे. या नात्याने तर हिंदुस्थान हिंदूचा आहेच.
Join Our WhatsApp Community