दुसऱ्या महायुद्धानंतर जपानच्या युद्ध कैद्यांना निर्दोष ठरवणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे धाडसी न्यायाधीश Radhabinod Pal

252
राधाबिनोद पाल (Radhabinod Pal) हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे न्यायाधीश होते. डॉ. पाल यांचा जन्म २७ जानेवारी १८८६ रोजी झाला. कोलकाता प्रेसिडेन्सी कॉलेज आणि कोलकाता विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते १९२३ ते १९३६ या काळात त्याच विद्यापीठात शिक्षक म्हणून रुजू झाले. १९४१ मध्ये त्यांची कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. ते तत्कालीन ब्रिटिश राजवटीचे सल्लागारही होते.
दुसऱ्या महायुद्धानंतर जपानविरुद्ध ’टोकियो ट्रायल्स’ नावाचा खटला सुरू झाला तेव्हा ते त्या खटल्याचे न्यायाधीश झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर सुदूर पूर्वेमध्ये जपानने केलेल्या युद्ध गुन्ह्यांविरुद्धचा आंतरराष्ट्रीय खटल्यात त्यांनी अनेकांना चकित करुन टाकले. ११ न्यायाधीशांपैकी ते एकमेव असे होते, ज्यांनी प्रत्येकजण निर्दोष असल्याचा निकाल दिला.
युद्ध कैद्यांच्या खटल्याला जेत्याने केलेली बळजबरीच आहे, असा निवाडा करत त्यांनी सर्व युद्ध कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय दिला होता. जपानमधील राष्ट्रवादी लोक राधाबिनोद पाल (Radhabinod Pal) यांचा खूप आदर करतात. अनेक भारतीय इतिहासकारांचे असे मत आहे की त्यांची वृत्ती वास्तवात वसाहतवादाच्या विरोधात होती. मात्र त्यांनी दिलेला निकाल ऐतिहासिक ठरला एवढे मात्र खरे.
जपानच्या युद्ध गुन्हेगारांशी त्यांचा विशेष संबंध नसला तरी लहानपणापासूनच जपानचा त्यांच्या खूप प्रभाव होता आणि पाश्चिमात्य देशांच्या विस्तारवादाच्या ते विरोधात होते आणि जपान हा एकमेव आशियाई देश होता, ज्याने विस्तारवादाला आवाहन दिले होते असे त्यांचे मत होते. डॉ. पाल यांनी आपल्या निर्णयात लिहिले की, “एखादी घटना घडल्यानंतर त्याबाबत कायदा करणे पूर्णपणे अयोग्य आहे.” त्यांच्या या निर्णयाचे सर्वांनी कौतुक केले. मात्र एवढे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असताना देखील शेवटच्या दिवसात त्यांना आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागले आणि १० जानेवारी १९६७ रोजी त्यांचे निधन झाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.