Veer Savarkar यांचा अवमान केल्याबद्दल राहुल गांधींना २ डिसेंबरला विशेष न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचा आदेश

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये, वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर (Veer Savarkar) यांनी राहुल गांधी यांनी 5 मार्च 2023 रोजी लंडनमध्ये वीर सावरकरांबद्दल बदनामीकारक टिप्पणी केल्याबद्दल पुण्यातील दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली.

26

पुण्यातील विधानसभेचे सदस्य (खासदार/आमदार) यांच्यासाठी असलेल्या विशेष न्यायालयाने महत्वाचा आदेश दिला. वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून त्यांची बदनामी, अवमान केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 2 डिसेंबर 2024 रोजी विशेष न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये, वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर (Veer Savarkar) यांनी राहुल गांधी यांनी 5 मार्च 2023 रोजी लंडनमध्ये वीर सावरकरांबद्दल बदनामीकारक टिप्पणी केल्याबद्दल पुण्यातील दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. 21 सप्टेंबर 2024 रोजी हे प्रकरण खासदार/आमदारांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आले. खासदार/आमदार न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी 4 ऑक्टोबर 2024 रोजी राहुल यांना समन्स बजावले होते की, “भारतीय दंड संहितेच्या कलम 500 नुसार शिक्षेस पात्र असलेल्या गुन्ह्याच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी तुमची उपस्थिती आवश्यक आहे म्हणून 23 ऑक्टोबर 2024 रोजी मॅजिस्ट्रेटसमोर वैयक्तिकरीत्या हजर रहावे असे न्यायालयाने म्हटले होते. पण समन्स न पोहोचल्याने गांधी हजर झाले नाहीत. यानंतर न्यायालयाने पुन्हा समन्स जारी करून राहुल गांधींना १८ नोव्हेंबरला हजर राहण्यास सांगितले. हे समन्स त्यांना पोस्टाने बजावण्यात आले होते आणि ते त्यांना प्राप्त झाले होते. आम्ही ऑनलाइन ट्रॅक अहवाल आणि पोस्टाच्या पावत्या न्यायालयात सादर केल्या आहेत की समन्स राहुल गांधींपर्यंत पोहोचले आहेत, असे याचिकाकर्ते सात्यकी सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर म्हणाले.

(हेही वाचा Veer Savarkar : वीर सावरकरांचा अवमान केल्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात दाखल खटल्याच्या तपासात दिरंगाई; सात्यकी सावरकरांचा गंभीर आरोप )

राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार यांनी न्यायालयाला सांगितले की, राहुल गांधी यांच्या कार्यालयाने त्यांना त्यांच्या वतीने हजर राहण्याची सूचना केली होती. पवार यांनी न्यायालयाला विनंती केली की त्यांनी राहुल गांधींचे प्रतिनिधित्व करणारा वकालतनामा दाखल केला नसला तरीही आपल्या विनंतीवर विचार करावा. पवार यांनी सादर केले की गांधींना समन्स त्यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झाले होते, परंतु ते लोकसभा विरोधी पक्षनेते असल्याने आणि गेल्या दोन महिन्यांत वेगवेगळ्या राज्यांतील निवडणूक प्रचारामुळे राहुल गांधी हे न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. राहुल गांधी पुढील सुनावणीला उपस्थित राहतील, असे आश्वासन पवार यांनी न्यायालयाला दिले. वकील कोल्हटकर यांनी न्यायालयात राहुल गांधींविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केला. गेल्या वर्षी गुजरातमधील एका न्यायालयाने गांधींना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले होते, असे त्यांनी सादर केले. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर, खासदार/आमदारांच्या न्यायालयाने राहुल गांधींना 2 डिसेंबरला वैयक्तिकरित्या हजर राहण्याचे निर्देश दिले.

काय आहे तक्रार?

सात्यकी सावरकर (Veer Savarkar) यांनी केलेल्या तक्रारीनुसार राहुल गांधी यांनी लंडनमध्ये सांगितले होते की, विनायक दामोदर सावरकरांनी एक पुस्तक लिहिले, ज्यात त्यांनी असे म्हटले होते की, ते (सावरकर) आणि त्यांचे पाच किंवा सहा मित्र एका मुस्लिमाला मारहाण होत असल्याचे पाहत असताना आनंदीत झालो. त्यानंतर राहुल गांधींनी म्हटले की, हे भ्याड कृत्य नाही का… पण सावरकरांनी राहुल गांधींनी दावा केल्याप्रमाणे असे कोणतेही पुस्तक लिहिलेले नाही किंवा अशी घटनाही घडलेली नाही, हे सात्यकी सावरकर यांनी पुराव्यासहित न्यायालयात मांडले आहे.

सात्यकी सावरकर यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे की, “राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर हेतुपुरस्सर खोटे आणि बिनबुडाचे आरोप केले आहेत. हे आरोप असत्य आहेत हे पूर्णपणे जाणूनही त्यांनी सावरकर (Veer Savarkar) आडनावाची बदनामी करण्याच्या विशिष्ट हेतूने प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याच्या दृष्टीने आरोप केले. या याचिकेत त्यांनी पुरावा म्हणून काही बातम्यांचे अहवाल तसेच राहुल गांधींच्या लंडनमधील भाषणाच्या व्हिडिओची YouTube लिंक सादर केली होती. सात्यकी यांनी आरोपींना आयपीसी कलम ५०० अंतर्गत जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.