रागाच्या भरात एका महिलेने तिच्या सहा लहान मुलांना विहिरीत फेकल्याची घटना महाड तालुक्यातील बोरगाव येथे घडली. या घटनेत सहाही मुलांचा मृत्यू झाला आहे. माणुसकीला काळीमा फासणा-या या घनेमुळे सध्या रायगड जिल्हा हादरला आहे.
सहाही मुलांचा बुडून मृत्यू
मूळ उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेल्या आणि सध्या शेलकोटी येथे वास्तव्याला असलेल्या रुना चिखरु साहनी (वय 30) या विवाहित महिलेचे काही कारणावरुन आपल्या पतीशी भांडण झाले. त्याच रागातून सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या महिलेने तिच्या सहाही मुलांना बोरगावजवळील एका शेतातील विहिरीत फेकून दिले. ही विहिर सुमारे दोनशे फूट खोल असल्याने, या सर्व मुलांचा बुडून मृत्यू झाला. यामध्ये पाच मुली व एका मुलाचा समावेश आहे.
( हेही वाचा: महापालिका कर्मचाऱ्यांनो व्यसनापासून दूर रहा: प्रशासनाने केले आवाहन )
आईचाही आत्महत्येचा प्रयत्न
आपल्या मुलांना विहिरीत ढकलल्यानंतर, महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला पण तिला गावक-यांनी वाचवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मुलांची शोधमोहिम सुरु केली. पोलिसांनी ग्रामस्थ आणि बचाव पथकाच्या मदतीने विहिरीत शिडी टाकून मुलांना बाहेर काढण्याचे काम सुरु केले. अखरे सर्व मुलांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. रेश्मा, करिश्मा, रोशनी, विद्या, राधा आणि शिवराज अशी या मुलांची नावे आहेत. या प्रकरणी या मुलांची आई रुना साहनी हिला ताब्यात घेण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community