अयोध्यात रेल्वे अपघाताचा कट उधळला! दहशतवादी संघटनांवर संशय

115

उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे रेल्वे पुलावर स्लीपर आणि ट्रॅकला जोडणारे नट-बोल्ट काढल्याचे आढळून आले. रानोपाली रेल्वे क्रॉसिंग आणि बडी बुवा रेल्वे क्रॉसिंगच्या दरम्यान जल्पा नाल्यावरील पुलावर हा प्रकार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान यात दहशतवादी संघटनेचा हात असू शकतो, अशी शंका सुरक्षा यंत्रणांकडून व्यक्त केली जाते. लखनऊचे डीआरएमही त्याची चौकशी करत आहेत.

रेल्वे हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेने घेणार

याबाबत रेल्वेकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. या प्रकरणी डिव्हीजनल रेल्वे मॅनेजर (डीआरएम) स्तरावर तपास सुरू करण्यात आला असून, रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तपासणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे नटबोल्ट खोडकर लोकांनी काढले की, हा दहशतवादी कट होता, याबद्दल चौकशी केली जात आहे. दुसरीकडे 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेने घेणार असल्याचे देखील समजते आहे. दरम्यान, या प्रकरणी आरपीएफ आणि अभियंत्यांच्या संयुक्त पथकाने आपला अहवाल डीआरएम कार्यालयात सादर केला आहे. नट बोल्ट गायब झाल्याची माहिती खुद्द आरपीएफनेच अयोध्या कोतवाली पोलिसांना दिली होती.

(हेही वाचा महाराष्ट्रात लागणार आणीबाणी! पाणी आणि वीजही नाही…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.