तुम्हाला रेल्वेत नोकरी करायची आहे, तर तुमच्यासाठी कोकण रेल्वेने चांगली संधी आणली आहे. तुम्ही सिव्हील किंवा मेकॅनिकल इंजिनीअर असाल तर तुम्हाला रेल्वेत नोकरीची संधी आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने असिस्टंट प्रोजेक्ट इंजिनीअर आणि सिनिअर टेक्निकल असिस्टंट पदांवर भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली असून या भरती प्रक्रियेंतर्गत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण १४ पदांवर भरती केली जाणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
अशी असणार अट
- कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे जारी नोटिफिकेशन नुसार अशा उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
- जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात, त्यांनी मान्यता प्राप्त म्हणजेच AICTE शी संलग्न विद्यापीठातून किमान ५५ टक्के गुणांसह सिव्हील / मेकॅनिकल इंजिनीयरिंगमध्ये ग्रॅज्युएट किंवा समकक्ष पदवी प्राप्त केलेली असावी.
- असिस्टंट प्रोजेक्ट इंजिनीयर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ४५ वर्षे असावे.
- या व्यतिरिक्त सीनियर टेक्निकल असिस्टंट पदासाठी वय ३५ वर्षे असणे आवश्यक आहे.
(हेही वाचा- लघु उद्योजकांना सुवर्णसंधी! उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार २०२१ साठी असा करा अर्ज )
या भरतीबाबात अधिक माहिती कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला https://konkanrailway.com/ येथे भेट देऊ शकता. या भरती प्रक्रियेंतर्गत जे उमेदवार अर्ज करू इच्छितात, त्यांचा ७ फेब्रुवारी २०२२ रोजी वॉक इन इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. या उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार, कोकण रेलवे कॉर्पोरेशन लिमिटेड सेक्टर-४०, सीवुड्स (वेस्ट), नवी मुंबई, ४००७०६ या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे यासाठी रजिस्ट्रेशन तेथेच सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत होईल.
Join Our WhatsApp Community