मध्य रेल्वेचा दोन दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक, कसं असणार गाड्यांचं वेळापत्रक

164

मुंबईकरांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. यावेळी मुंबईकरांना मेगा ब्लॉकसोबतच पॉवर ब्लॉकचाही सामना करावा लागणार आहे. तुमचे जर एक्सप्रेसने किंवा लोकल ट्रेनने कुठे बाहेर जाण्याचे नियोजन असेल तर जरा थांबा आणि ही महत्त्वाची बातमी वाचा. कुर्ला प्लॅटफॉर्मवर पादचारी पुलाच्या गर्डरसाठी 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी (शनि/रवि मध्यरात्री) रात्रीचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Indian Railway: ट्रेनच्या बोगीवर असलेल्या ‘या’ पिवळ्या रेषांचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?)

मध्य रेल्वे कुर्ला प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 5 वर 8.0 मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिजचे पाच प्लेट गर्डर लॉंच करण्यासाठी 250 MT रोड क्रेन वापरून अप धीम्या मार्गावर आणि डाउन जलद मार्गावर रात्रीचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी (शनिवार/रविवार रात्रीची) सकाळी 00.30 ते 06.00 पर्यंत अप धीम्या मार्गावर विद्याविहार ते माटुंगा दरम्यान आणि डाउन जलद मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान हा ब्लॉक घेतला जाणार आहे.

कसं असणार गाड्यांचं वेळापत्रक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 05.20 वाजता सुटणारी के-1 कल्याण जलद एसी लोकल शॉर्ट ओरीजीनेट होऊन घाटकोपर येथून पहाटे 05.44 वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 12.24 वाजता सुटणारी एस-5 कर्जत लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे.

घाटकोपर येथून सकाळी 12.10 ते 06.00 या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या लोकल विद्याविहार आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि विद्याविहार स्थानकावर थांबणार नाहीत. तर अप उपनगरीय सेवा विद्याविहार स्टेशनवर ब्लॉक कालावधीत उपलब्ध नसतील, याची मुंबईकर रेल्वे प्रवाशांनी नोंद घ्यावी असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.