बऱ्याचदा लांब पल्ल्याचा रेल्वेने प्रवास करताना तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला असेल, किंवा तुमच्यामुळे देखील इतरांना त्रास झाला असेल. प्रवास करताना अनेकदा ग्रृपने प्रवास करतात. अनेकदा रात्री अशा ग्रृपने प्रवास करणाऱ्यांमुळे गोंधळ झाल्याचे दिसते. रात्री उशीरापर्यंत गप्पा मारणे आणि गाणे ऐकणे, या गाण्यांच्या आवाजामुळे इतर प्रवाशांना त्रास झाल्याने मग वाद होणं हे कित्येकदा रेल्वेत होत असतं. मात्र आता प्रवास करताना अशा प्रवाशांना असे वागता येणार नाही. कारण भारतीय रेल्वेकडून रेल्वेमध्ये प्रवास करण्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. रेल्वेने रात्रीच्या वेळी प्रवाशांना झोपेचा त्रास लक्षात घेऊन काही मोठे बदल केले आहेत. तुम्ही देखील रात्रीचा प्रवास करत असाल तर नक्की वाचा…
म्हणून घेतला रेल्वेने हा निर्णय
रेल्वे मंत्रालयाच्या वतीने सर्व झोनला आदेश जारी करून हे नियम तातडीने लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नवीन नियमानुसार रात्री उशीरा मोठ्या आवाजामध्ये कोणताही रेल्वे प्रवासी मोबाईलवर बोलू शकत नाही. तसेच मोठ्या आवाजात गाणी ऐकू शकणार नाही. जर एखाद्या प्रवासी मोठ्या आवाजात फोनवर बोलत असेल किंवा गाणे ऐकत असेल तर रेल्वे आता अशा लोकांवर कारवाई करणार आहे. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
(हेही वाचा – बापरे! थंडी आणि धुक्यामुळे ‘या’ ४८१ रेल्वे गाड्या रद्द)
असे आहेत नवे नियम
- कोणत्याही प्रवाश्याला रात्री 10 नंतर मोठ्याने बोलता येणार किंवा मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणे ऐकणार नाही.
- रात्रीच्या वेळी प्रवाश्यांची झोप खराब होऊ नये. यासाठी नाईट लाईट सोडून इतर सर्व लाईट बंद राहतील.
- ग्रुपमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत रेल्वेमध्ये गप्पा मारत बसता येणार नाहीत.