Rain : ये रे ये रे पावसा! आश्चर्य, या गावात पावसाचा एक थेंब सुद्धा पडत नाही

आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, हे गाव जगातील सर्वात सुंदर गावांपैकी एक आहे. इथे सतत पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

199
Rain : ये रे ये रे पावसा! आश्चर्य, या गावात पावसाचा एक थेंब सुद्धा पडत नाही

हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा (Rain) हे आपल्याकडे तीन मुख्य ऋतू आहेत. तसेच मूळ व्यवसाय शेती हा आहे. शेती करण्यासाठी मुबलक प्रमाणात पाऊस लागतो. पाऊस नाही पडला तर शेती करता येणे शक्य नाही. पण या जगात अशीही ठिकाणे आहेत जिथे सतत पाऊस पडत असतो तर काही ठिकाणे अशी आहेत जिथे अजिबात पाऊस पडत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ठिकाणाची माहिती सांगणार आहोत. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, हे गाव जगातील सर्वात सुंदर गावांपैकी एक आहे. इथे सतत पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. पाऊस पडत नसलेल्या या गावच्या वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी जगभरातील पर्यटक इथे येत असतात.

(हेही वाचा – ‘सागर परिक्रमा’…. अनोखा उपक्रम)

मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार हे गाव यमनची राजधानी सना येथे वसलेले आहे. ‘अल हुतैब’ असं या गावाचं नाव आहे. या गावचे वातावरण नेहमीच उष्ण असते. हिवाळ्यात मात्र इथे सकाळच्या वेळेस खूप थंडी पडते. ही थंडी इतकी असते की तुम्ही जाड पांघरूण घेतल्याशिवाय झोपू शकत नाही. पण उन्हाळ्यात तुम्हाला तितक्याच प्रखर उष्णतेचा सामना करावा लागतो.

या गावात कधीही पाऊस पडत नाही. त्याचेही एक खास कारण आहे. हे गाव पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 3,200 मीटरच्या उंचीवर वसलेले आहे. स्थानिक रिपोर्टनुसार पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 2000 मीटरच्या उंचीवर ढग तयार होतात. म्हणजे या गावाच्या बऱ्याच खालच्या अंतरावर ढग तयार होत असल्याने इथे कधीही पाऊस पडत नाही. तरीही या गावचे लोक ते स्वर्गात राहत असल्याचे मानतात.

हेही पहा – 

आणखी एका मीडिया रिपोर्टनुसार अल हुतैब हे गाव प्रसिद्ध आहे. हे गाव एका उंच पर्वताच्या शिखरावर वसलेले आहे. त्यामुळे या गावातून खाली दिसणारे नयनरम्य दृश्य इथे येणाऱ्या पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकते. या गावांमध्ये जास्त घरं नाहीत तरीही इथली संस्कृती प्राचीन आणि आधुनिक वास्तुकलांना दर्शवते. ग्रामीण आणि शहरी भागातील सुविधांचा मेळ या ठिकाणी पाहायला मिळतो. या गावचे बहुतेक लोक ‘अल बोहरा’ आणि ‘अल मुकरमा’ या समुदायाशी जोडलेले दिसतात. त्यांना ‘यमन समुदाय’ असेही म्हटले जाते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.