राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार

राज्यात गायब असलेल्या वरुणराजाने पुन्हा सतर्क होण्याचे संकेत दिले आहेत. शुक्रवारपासून मान्सून राज्यातील बहुतांश भागात सतर्क होत असल्याचे संकेत मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिले आहेत. दुपारी जाहीर झालेल्या अंदाजात शुक्रवारी दक्षिण कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर तसेच सातारा जिल्ह्यातील घाट परिसराला अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र जुलै महिन्यासारखी रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि साताऱ्यात पावसाचा धिंगाणा दिसून येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

शुक्रवारी वादळी वारे वाहणार

शुक्रवारी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह ताशी 30/40 प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहतील. औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोलीतही वाऱ्यांचा वेग ताशी 30/40 प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहतील. नांदेड तसेच लातूर, उस्मानाबाद मध्येही जोमाने वारे वाहतील. बीडमध्ये येत्या दिवसांतही पाऊस गायब राहील इतर भागात पावसाची अधून मधून मुसळधार सरी कोसळतील. औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारपासून पावसाचा जोर वाढेल, शनिवारी मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट तर मंगळवारपर्यंत अतिवृष्टीमुळे ऑरेंज अलर्ट राहील.

रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्याला पाऊस झोडपणार

दक्षिण कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात पाच दिवस अतिवृष्टीचे असतील. रत्नागिरीला मंगळवारपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र रायगड जिल्ह्यात पुन्हा पूरजन्य परिस्थितीची शक्यता आहे. शनिवारीपासून रायगडमध्ये सुरु होणाऱ्या अतिवृष्टीचा जोर सोमवारनंतर अजूनच वाढेल. काही ठिकाणी अतिवृष्टीसह जोरदार सरी कोसळतील, त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी रायगडमध्ये जन जीवन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रत्नागिरीत सोमवारपर्यंत अतिवृष्टीसह पावसाचा धिंगाणा सुरु राहील. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा येथील घाट परिसरात शुक्रवारपासून सलग पाचदिवस अतिवृष्टी राहील. पुण्यात शनिवारपासून अतिवृष्टीला सुरुवात होईल. तिन्ही जिल्ह्याला अतिवृष्टीसह ऑरेंज अलर्ट राहील.

कोकणात विकेंड गाजणार 

कोकणात मुंबई, ठाणे वगळता पालघर आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसासाठी शुक्रवारी येलो अलर्ट राहील. पालघर आणि ठाण्याला पुढील चार दिवस पावसाची संततधार असेल. दोन्ही जिल्ह्यात विकेंडला मुसळधार पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारी सिंधुदुर्ग वगळता इतर जिल्ह्यात अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट कायम राहील. सिंधुदुर्गात रविवारपासून  येलो अलर्ट असून, मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवस कायम राहील.

विदर्भातही रविवारनंतर ऑरेंज अलर्ट

शुक्रवारपासून मेघगर्जना आणि विजाच्या कडकडाटासह विदर्भातील बहुतांश भागात मॉन्सूनपूर्व पावसाचे वातावरण दिसून येईल. गडचिरोली, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात शुक्रवारी मुसळधार पाऊस राहील. शनिवारपासून भंडाऱ्यात सलग तीन दिवस मुसळधार पावसानंतर ऑरेंज अलर्टसह मंगळवारी अतिवृष्टी राहील. गडचिरोली जिल्ह्याला रविवारपासून सलग तीन दिवस तर गोंदियात सोमवारी आणि मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here