शिल्पा म्हणाली, कुंद्राची कंपनी माहीत, पण त्याचे ‘उद्योग’ नाही!

कुंद्राच्या २००५मध्ये स्थापन झालेल्या विहान कंपनीत माझे २४.५ टक्के समभाग आहेत, मात्र त्याची कंपनी काय काम करते, हे मात्र मला माहीत नव्हते, असे शिल्पा शेट्टी म्हणाली.

चित्रपटसृष्टीत करियर करू इच्छिणाऱ्या तरुणींना फसवून त्यांच्या अश्लील चित्रफिती तयार करून त्या मोबाईल ऍप वरून विकणारा राज कुंद्रा सध्या अटकेत आहे. त्याच्या विरोधात गुन्हे अन्वेषण विभागाने १ हजार ४९७ पानांचे आरोपपत्र दाखल केले. त्यामध्ये कुंद्राची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीसह ५८ जण साक्षीदार बनले आहेत. त्यामध्ये शिल्पाने जबाबामध्ये म्हटले की, मला कुंद्राच्या विआन कंपनीबाबत माहिती होती, पण त्या कंपनीचे काय उद्योग सुरु होते, ते मात्र माहीत नव्हते, असे म्हटले आहे.

काय म्हणाली शिल्पा? 

कुंद्राच्या २००५मध्ये स्थापन झालेल्या विआन कंपनीत माझे २४.५ टक्के समभाग आहेत, मात्र त्याची कंपनी काय काम करते, हे मात्र मला माहीत नव्हते. त्याच्या कंपनीच्या हॉटशॉट आणि बॉली फेम या मोबाईल अप्लिकेशनबद्दलही मी अनभिज्ञ होते. कारण मी माझ्या कामात व्यस्त असायची, असे शिल्पा शेट्टीने तिच्या जबाबात म्हटले आहे.

(हेही वाचा : महाविकास आघाडीचा ‘उद्योग’ पिछाडीवर!)

खटल्यात ९ आरोपी!

सध्या कुंद्रा हा न्यायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने महा न्यायदंडाधिकारी एस.बी. भाजीपाले यांच्याकडे पुरवणी आरोपपत्र दाखल केले. यात ९ आरोपी आहेत. त्यामध्ये अभिनेत्री आणि दिग्दर्शिका गहना वशिष्ठ हिचाही समावेश आहे. तर त्यात कुंद्राच्या कंपनीतील कर्मचारी रयान थोरपे याला आरोपी केले असून तोही न्यायालयीन कोठडीत आहे. तर अरविंदकुमार श्रीवास्तव हा आरोपी मात्र फरार आहे. तो सध्या सिंगापूर येथे असल्याची माहिती आहे. तर कुंद्राचा नातलग प्रदीप बक्षी हाही फरार आहे. आरोपींवर भा.दं.वि. कलम ३५४ सी, २९२, २९३, ४२० आणि २०१ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here