रेल्वेतील भरतीसाठी मराठी तरुणांनी जागरूक राहावे, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक्स समाज माध्यमावर पोस्ट करत केले आहे.
रेल्वेमध्ये लोको पायलट या पदाच्या भरतीसाठी वर्तमान पत्रात जाहिरात प्रसिद्ध झाली असून ती राज यांनी पोस्ट केली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणतात, भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाची एक जाहिरात आली आहे. सहाय्यक लोको पायलटच्या ५६९६ जागा आहेत त्यासाठी १८ ते ३० वयाची मर्यादा आहे.
(हेही वाचा – Rajya Sabha Election 2024 : महाराष्ट्रातून राज्यसभेवरील रिक्त सहा जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक)
अधिक तपशील ह्या जाहिरातीत दिलेल्या वेबसाईटवर मिळेल तो जरूर पहावा. ह्यामध्ये जास्तीत जास्त मराठी तरूण-तरूणींना रोजगार मिळेल हे पहावे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा “रोजगार आणि स्वयं-रोजगार विभाग ह्यासाठी तत्पर आहेच.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी नुसतंच “बघा वेबसाईट” असे म्हणून चालणार नाही. शाखा-शाखांवर, संपर्क कार्यालयांत, गडांवर याचा रितसर तपशील लावावा. सदर विषयातल्या तज्ञ मंडळींना ही जाहिरात दाखवून व्यवस्थित सूचना तयार कराव्यात. त्या आपल्या कार्यालयांत लावाव्यात. वाटल्यास हा अर्ज कसा भरायचा, मुलाखत कशी द्यायची ह्याचंही पूर्ण मार्गदर्शन करावे. जास्तीत-जास्त मराठी तरुणांनी नोकरी कशी मिळवेल याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन राज यांनी केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community