लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, हजारो भाविकांची राजाला निरोप देण्यासाठी गर्दी

मुंबईत गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुकीचा जल्लोष सुरु झाला आहे. लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. ढोल ताशांच्या नादात भव्य मिरवणूक निघाली आहे. मिरवणूकीमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक सामिल झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या राजाची मिरवणूकदेखील मोठ्या जल्लोषात निघाली आहे. ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. दोन्ही गणपती बाप्पांच्या मिरवणुकींना चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मुंबईत बाप्पाच्या विसर्जनाची भव्य मिरवणूक पाहायला मिळत आहे. ढोलताशांचा गजर, त्यावर बेभान होऊन नाचणारे भक्त. गुलालांची उधळण, तसेच बाप्पावर ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतषबाजी असे, दृश्य सध्या मुंबईच्या लालबागच्या विसर्जन मिरवणुकीत पाहायला मिळत आहे.

( हेही वाचा: गोल्डन बाॅय नीरजने पुन्हा घडवला इतिहास, प्रतिष्ठेची डायमंड लीग स्पर्धा जिंकली )

विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे सज्ज

मुंबईप्रमाणेच पुण्यातही विसर्जन मिरवणुकींची तयारी सुरु आहे. ढोलपथके, रस्तोरस्ती काढलेल्या रांगोळ्या आणि गणरायांचे रथ पाहायला मिळत आहेत. पुण्यात पारंपारिक मिरवणुकीसाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here