मागच्या दोन वर्षांच्या निर्बंधनानंतर गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. दोन वर्षांनंतर भक्त आपल्या लाडक्या बाप्पाचे म्हणजेच लालबागच्या राजाचे दर्शन करण्यासाठी मोठ्या संख्येने जमले. पंरतु गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एक अप्रिय घटना घडली.
लालबागचा गणेशोत्सव संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. देशभरातून अनेक भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजेरी लावत असतात. त्यामुळे लालबागमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असते. यापूर्वीही अनेकदा मंडळातील कार्यकर्त्यांची अरेरावी, पोलिसांची दमदाटी, धक्काबुक्की, ढकलाढकली यांसारख्या घटना लालबागच्या राजाच्या दरबारात घडल्याचेही पाहायला मिळाले आहे. यंदा मुखदर्शनाच्या रांगेतून जाताना वाद झाल्याची माहिती मिळत आहे.
( हेही वाचा: मुंबईकरांसाठी गणेशोत्सवानिमित्त ‘बेस्ट’ ऑफर; फक्त २० रुपयांत ५० फेऱ्या )
लालबागच्या दरबारात धक्काबुक्की
लालबागच्या राजाच्या दरबारात भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची झाली. मुखदर्शनाच्या रांगेत असलेली एक महिला आणि काही महिला सुरक्षारक्षकांमध्ये हा वाद झाला. यावेळी भाविक महिलेने महिला सुरक्षारक्षकाला धक्काबु्क्की केल्याचेही पाहायला मिळाले. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या घटनेने गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राजाच्या दरबारात काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.
Join Our WhatsApp Community