राजेश खन्ना (Rajesh Khanna) आज आपल्यात नाहीत. मात्र त्यांचा अभिनय अजूनही जिवंत आहे. विशेष म्हणजे ते बॉलिवुडचे पहिले सुपरस्टार होते. सत्तरच्या दशकात राजेश खन्ना हे नाव तरुणींच्या ह्रदयावर कोरलेले होते. त्यांना लोक लाडाने काका म्हणायचे.
काका यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ रोजी झाला. त्यांचे खरे नाव जतिन खन्ना असे होते. रवी कपूर म्हणजेच अभिनेता जितेंद्र हे लहानपणी त्यांच्याच शाळेत शिकत होते. शिक्षण घेत असताना त्यांना नाटकाची आवड लागली. राजेश खन्ना यांनी १९६६ मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी “आखरी खत” या चित्रपटात पहिल्यांदा काम केले होते. यानंतर त्यांनी राझ, बहारों के सपने, आखरी खत हे सलग तीन यशस्वी चित्रपट केले.
त्यांच्या अभिनय क्षेत्रातला टर्निंग पॉइंट ठरलेला चित्रपट म्हणजे १९६९ मध्ये आलेला आराधना… हा त्यांचा पहिला प्लॅटिनम ज्युबिली सुपरहिट चित्रपट होता. आराधना नंतर त्यांनी हिंदी चित्रपटांच्या पहिल्या सुपरस्टारचा किताब पटकावला. त्यांनी मागे वळून पाहिले नाही आणि सलग १५ सुपरहिट चित्रपट दिले.
(हेही वाचा-Coronavirus : भारतात २४ तासांत ७०२ कोरोना रुग्णांची नोंद, सहा जणांचा मृत्यू)
आराधना, इत्तफाक, दो रास्ते, बंधन, डोली, सफर, खामोशी, कटी पतंग, आं मिलो सजना, ट्रेन, आनंद, सच्चा झूठा, दुश्मन, मेहबूब की मेहंदी, हाथी मेरे साथी असे एकामागोमाग एक हिट चित्रपट दिल्यामुळे ते इंडस्ट्रीवर जणू राज्य करु लागले.
आराधना चित्रपटामुळे ते रोमॅंटिक हीरो झाले. त्यामुळे त्यांना इतर अनेक रोमॅंटिक चित्रपटच मिळाले. तरुण मुली हा त्यांचा चाहता वर्ग होता. राजेश खन्ना आजारी पडले तेव्हा दिल्ली काॅलेजच्या मुलींनी त्यांच्या फोटोवर बर्फाची पिशवी ठेवली, जेणेकरुन त्यांचा ताप उतरावा. मुलींनी त्यांना आपल्या रक्ताने प्रेम पत्रे पाठवली आहेत.
पुढे त्यांनी बावर्चीमध्ये विनोदी अभिनेत्याची भूमिका सुद्धा छान रंगवली. आनंद या चित्रपटातून त्यांनी अगदी वेगळा अभिनय केला. काका यांनी चार दशकात सुमारे १२५ चित्रपटांमध्ये अभिनय केला. १८ जुलै २०१२ रोजी ते हा पृथ्वीलोकावरचा रंगमंच सोडून स्वर्गातल्या रंगमंचावर कला सादर करायला निघून गेले.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community