राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. यासोबत ओमायक्रॉनच्या भितीने पुन्हा एकदा राज्याची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का अशी चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पूर्ण विराम दिला आहे. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. रूग्णवाढ आणि कोरोना लसीकरणाचा वेग यावर देखील झालेल्या चर्चेनंतर ते म्हणाले, राज्यामध्ये १०० टक्के लॉकडाऊन करण्याची आवश्यकता नाही.
काय म्हणाले आरोग्यमंत्री
राज्यातील सध्याची कोरोना परिस्थिती पाहता टास्क फोर्सने लॉकडाऊन संदर्भात बोलताना असा प्रस्ताव दिला की, लॉकडाऊनऐवजी ऑगमेंडेट रिस्ट्रीक्शन्स लागू करण्याचा प्रस्ताव दिला. मागील ७२ तासांमध्ये बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे रूग्णांचा शोध घेण्यासाठी कोरोना चाचण्यांच्या संख्या वाढविण्यात आल्या आहे. दरम्यान, खासगी रुग्णालयांनी त्यांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्याची परवानगी मागितली होती. त्यानंतर आता रुग्णालयांना त्यांच्या स्तरावर बूस्टर डोस घेण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती राजेश टोपेंनी माध्यमांशी बोलताना दिली.
(हेही वाचा- ‘बेस्ट’च्या ताफ्यात कोरोनाची एन्ट्री! ६६ कर्मचाऱ्यांना बाधा)
या पुढे राजेश टोपे म्हणाले, कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यात येणार आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने प्रत्येकाचे आरटीपीसीआर केल्यास ताण पडले. त्यामुळे राज्याची जेवढी क्षमता आहे त्यानुसार टेस्ट करण्यात येणार आहे. रोज साधारण २ लाख चाचण्या व्हायला पाहिजेत.परंतु त्याने पुरेसे होणार नाही यासाठी अँटीजेन टेस्टवर भर देण्यात येणार आहे. अँटीजेनवर पॉझिटिव्ह आल्यावर पुन्हा आरटीपीसीआर करण्याची आवश्यकता नाही.
Join Our WhatsApp Community