राज्यातील कोरोना निर्बंधाबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना स्थितीबाबत माहिती दिली. युरोप, चीन, साऊथ कोरियात वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव आणि वाढणारी बाधितांची संख्या पाहता अद्याप कोरोनासंदर्भात सतर्कता बाळगावी लागणार आहे. मात्र सध्या तरी पूर्णपणे मास्क मुक्तीचा विचार नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, गुढीपाडव्याच्या दिवशी राज्यातील जनतेला एक खुशखबर मिळणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोकण्यात देशात आरोग्य यंत्रणेला यश आले असून गुढीपाडव्याच्या दिवशी कोविडचे निर्बंध पुर्णपणे हटवले जाण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – नवनीत राणांची एकच तक्रार अन् राज्यातील चार अधिकाऱ्यांना थेट नोटीस!)
…म्हणून लावलेले निर्बंध हटवण्यात येणार
महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर आपत्ती व्यवस्थापण कायदा राज्यात लागू करण्यात आला होता. पण सध्या कोरोनाचा संसर्ग कमी असल्याने लावलेले निर्बंध हटवण्यात येणार आहेत. त्यामुळे मास्क वापरणे आता बंधनकारक राहणार नाही. पण इतर देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने मास्क सोशल डिस्टन्सिंगसाठी सतत आवाहन करण्यात येत आहे. कोरोना लसीकरणाच्या बाबतीत चलढकल नको, अशा सूचना राजेश टोपे यांनी दिल्या आहे. लोकांकडून वारंवार रेल्वे, बस, मॉल्स यासंबंधी निर्बंध शिथील करण्याच्या मागण्या आल्या. त्यावर आता सकारात्मक विचार करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यामुळे मास्क मुक्तीचे धाडस शक्य नाही
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले की, लसीकरणाचे लक्ष्य गाठण्याचे सरकारचा प्रयत्न आहे. परदेशामध्ये कोरोनाचा धोका वाढत असल्याने येणारे सणवार साजरे करताना काळजी घ्या. दुसऱ्या देशांमधील चौथ्या लाटेचा परिणाम आपण पाहतो आहोत. त्यामुळे मास्क मुक्तीचं धाडस शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरलेच गेले पाहिजे. तेच आपल्यासाठी हितकारक आहे. तुर्तास तरी संपूर्णपणे मास्क मुक्तीचा कसलाही विचार सरकारने केलेला नाहीये. त्यामुळे मास्क घातलेच पाहिजे.