राजीव गांधींच्या मारेक-याची होणार सुटका: सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

101

राजीव गांधींच्या मारेक-याची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे तब्बल 30 वर्षांनी राजीव गांधींचा मारेकरी पेरारिवलन याची सुटका होणार आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणातील पेरारिवलन दोषी आहे. 1991 मध्ये पेरारिवलनला अटक करण्यात आली होती.

कोण आहे पेरारिवलन ?

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणातील दोषी यांच्या हत्याप्रकरणातील दोषी, 1991 मध्ये पेरारिवलनला अटक करण्यात आली होती. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडाचा मुख्य सुत्रधार शिवरासन याला स्फोटाची सामग्री पुरवल्याचा आरोप पेरारिवलन याच्यावर आहे. 1999 मध्ये याच आरोपांखाली त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत केले. मार्च 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पेरारिवलन याला जामिन दिला आणि कारागृहातून सुटकेसाठी त्याने अर्ज केला. तामिळनाडू सरकारने त्वरित निर्णय न घेतल्याने त्याने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आणि आता सर्वोच्च न्यायालयाकडून सुटकेचे आदेश देण्यात आले आहेत.

( हेही वाचा :मध्य प्रदेशात ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाची परवानगी )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.