लग्न समारंभात गॅस सिलिंडरचा स्फोट; 4 व-हाड्यांचा मृत्यू तर 63 हून अधिक जण होरपळले

92

राजस्थानच्या जोधपूरमध्ये एका लग्न समारंभात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने गोंधळ उडाला. या अपघातात तब्बल 63 हून अधिक लोक होरपळले असून, 4 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शेरगडजवळील भुंगरा गावात गुरुवारी दुपारी 3.15 वाजता हा अपघात झाला. येथे एका घरी विवाह सोहळा होता. मिरवणूक घरातून निघणार होती, तेवढ्यात अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

10 लोक 80 टक्क्यांहून अधिक भाजले

या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता रुग्णालयात पोहोचले. या घटनेत 10 हून अधिक लोक 80 टक्क्यांहून अधिक भाजले असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुंगरा येथील रहिवासी सगतसिंग गोगादेव यांच्या मुलाचे गुरुवारी लग्न होणार होते. हे सर्व लोक वरात काढण्यासाठी गावात जमले होते. तिथे जेवणापूर्वी सिलिंडरमधून गॅस गळतीमुळे स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की घराचे छतही कोसळले. सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत महिला व लहान मुलांसह उपस्थित 63 हून अधिक लोक होरपळले.

( हेही वाचा: कोल्हापूरमध्ये 15 दिवसांसाठी जमावबंदी; ‘हे’ आहे कारण )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.