मंत्रालयाजवळ आत्महत्येचा प्रयत्न एका दाम्पत्याकडून करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. राजू चिनप्पा मुरगुंडे असे या व्यक्तीचे नाव असून त्याने आपल्या पत्नीसह आत्महत्येचा प्रयत्न केला. बांधकाम विभागातील कर्मचा-यांकडून होणा-या त्रासामुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे, समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दाम्पत्याला ताब्यात घेतले आहे. मंत्रालय परिसरात हा आत्महत्येचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे.
8 महिन्यांपासून करत होते आंदोलन
राजू चिनप्पा मुरगुंडे यांचे मागच्या 8 महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. बांधकाम विभाग कर्मचा-यांकडून त्रास देण्यात आल्याचे सांगत त्यांच्याविरोधात राजू यांनी आंदोलन पुकारले होते. राजू यांच्यावर सातत्याने होणा-या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी नांदेडपासून मुंबईपर्यंत धाव घेतली. हे दाम्पत्य नांदेडचे असल्याची माहिती समोर आली आहे.
( हेही वाचा ब्रेकिंग: राजीव कुमार देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त होणार, 15 मे रोजी स्वीकारणार पदभार )
…म्हणून आत्महत्येचा प्रयत्न
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सातत्याने होणा-या अन्यायाविरुद्ध त्यांनी आंदोलन केले, उपोषणं केली,दाद मागितली, मंत्रालयाच्या फे-या मारल्या, पण तरीही न्याय मिळत नाही म्हणून अखेर या दाम्पत्याने अंगावर राॅकेल ओतून मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
Join Our WhatsApp Community