मंत्रालयासमोर दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

138

मंत्रालयाजवळ आत्महत्येचा प्रयत्न एका दाम्पत्याकडून करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. राजू चिनप्पा मुरगुंडे असे या व्यक्तीचे नाव असून त्याने आपल्या पत्नीसह आत्महत्येचा प्रयत्न केला. बांधकाम विभागातील कर्मचा-यांकडून होणा-या त्रासामुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे, समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दाम्पत्याला ताब्यात घेतले आहे. मंत्रालय परिसरात हा आत्महत्येचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे.

8 महिन्यांपासून करत होते आंदोलन

राजू चिनप्पा मुरगुंडे यांचे मागच्या 8 महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. बांधकाम विभाग कर्मचा-यांकडून त्रास देण्यात आल्याचे सांगत त्यांच्याविरोधात राजू यांनी आंदोलन पुकारले होते. राजू यांच्यावर सातत्याने होणा-या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी नांदेडपासून मुंबईपर्यंत धाव घेतली. हे दाम्पत्य नांदेडचे असल्याची माहिती समोर आली आहे. 

( हेही वाचा ब्रेकिंग: राजीव कुमार देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त होणार, 15 मे रोजी स्वीकारणार पदभार )

…म्हणून आत्महत्येचा प्रयत्न

सार्वजनिक बांधकाम  विभागाकडून  सातत्याने होणा-या अन्यायाविरुद्ध त्यांनी आंदोलन केले, उपोषणं केली,दाद मागितली, मंत्रालयाच्या फे-या मारल्या, पण तरीही न्याय मिळत नाही म्हणून अखेर या दाम्पत्याने अंगावर राॅकेल ओतून मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.