गान कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना सोमवारी, 7 फेब्रुवारी रोजी राज्यसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच त्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव सादर करून तासाभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.
संगीत क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरुन न निघण्यासारखी
राज्यसभेच्या सदस्यांनी एक मिनिट उभे राहून मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. राज्यसभेचे सभापती एम व्यंकया नायडू यांनी गायिका आणि सभागृहाच्या माजी सदस्या लता मंगेशकर यांच्या मृत्यूबद्दल शोकप्रस्ताव सादर केला. कामकाज सुरु होण्याआधीच त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच त्यानंतर एका तासासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. यावेळी उपराष्ट्रपती म्हणाले की, लता मंगेशकरांच्या जाण्यामुळे देशाचं अतोनात नुकसान झाले आहे. मंगेशकर यांच्या निधनामुळे भारतीय संगीत आणि चित्रपट क्षेत्रातील एक दयाळू व्यक्ती आणि एक उत्तुंग व्यक्तिमत्व आपण गमावले आहे. त्यांच्या जाण्यामुळे जणू एका युगाचा अस्त झाला आहे. यामुळे संगीत क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरुन न निघण्यासारखी आहे, अशा शब्दात नायडू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.
(हेही वाचा लता दीदींचा सन्मान करण्यात महाराष्ट्राच्या आधी ‘या’ राज्याने मारली बाजी!)
Join Our WhatsApp Community