Rakhaldas Banerjee : मोहेंजोदडो संस्कृतीचा शोध घेणारे भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ राखालदास बॅनर्जी

मोहेंजोदडो आणि सिंधू संस्कृतीच्या विषयी लंडन येथील आर्थर प्रॉब्स्टेन यांनी १९३१ साली सादर केलेल्या प्रस्तावनेमध्ये सर जॉन मार्शल यांनी राखालदास बॅनर्जी यांचे आणि त्याच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले आहे.

185
Rakhaldas Banerjee : मोहेंजोदडो संस्कृतीचा शोध घेणारे भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ राखालदास बॅनर्जी

राखालदास बॅनर्जी (Rakhaldas Banerjee) म्हणजेच राखालदास बंदोपाध्याय हे भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच ASI चे अधिकारी होते. १९१९ साली मोहेंजोदडो संस्कृतीच्या ठिकाणाचे सर्वेक्षण करण्यासाठी नियुक्त केलेले ते दुसरे ASI अधिकारी होते. १९१९ ते १९२२-२३ सालच्या दरम्यान ते आपलं संशोधन करून परतले. त्या ठिकाणच्या दुर्गम आणि पुरातन वास्तूचा प्रस्ताव देणारे ते पहिले व्यक्ती होते. (Rakhaldas Banerjee)

मोहेंजोदडो आणि सिंधू संस्कृतीच्या विषयी लंडन येथील आर्थर प्रॉब्स्टेन यांनी १९३१ साली सादर केलेल्या प्रस्तावनेमध्ये सर जॉन मार्शल यांनी राखालदास बॅनर्जी यांचे आणि त्याच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले आहे. संशोधन करताना अडचणी आल्या तरी बॅनर्जी (Rakhaldas Banerjee) आणि त्यांचे सहकारी अजिबात डगमगले नाहीत. सर्वांनी मिळून आपलं संशोधन पूर्ण केलं. असे सर जॉन मार्शल आपल्या प्रस्तावनेत सांगतात. (Rakhaldas Banerjee)

राखालदास बॅनर्जी (Rakhaldas Banerjee) यांचा जन्म १८८५ साली पश्चिम बंगालमधील भारताचा भाग असलेल्या बेहरामपूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मतीलाल आणि आईचे नाव कालिमाती असे होते. १९०० साली त्यांनी कृष्णानाथ कॉलेज स्कूल येथून प्रवेश परीक्षा पास केली. त्यावेळी ते बाणगाव येथे राहत होते. त्यानंतर त्यांनी नरेंद्रनाथ मुखोपाध्याय यांची मुलगी कांचनमाला हिच्याशी लग्न केलं. (Rakhaldas Banerjee)

(हेही वाचा – Social Media: सोशल मीडियाच्या वापरात मध्य रेल्वेने पटकावले अव्वल स्थान !)

पहारपूर येथील उत्खननात भाग

पुढे ते १९०३ साली एफए च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यानंतर १९०७ साली त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून इतिहास या विषयात ऑनर्स घेऊन पदवी मिळवली आणि १९११ साली त्यांनी कलकत्ता युनिव्हर्सिटीमधून इतिहास विषयात एमए ची पदवी मिळवली. राखालदास बॅनर्जी हे १९१० साली कलकत्ता येथील भारतीय संग्रहालयात पुरातत्व विभागाचे सहाय्यक म्हणून रुजू झाले. (Rakhaldas Banerjee)

त्यानंतर पुढच्याच वर्षी ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षणात सहाय्यक अधिक्षक म्हणून रुजू झाले आणि १९७१ साली त्यांना वेस्टर्न सर्कलच्या सुप्रीटेंडेंट आर्किओलॉजिस्ट या पदावर बढती मिळाली. त्यानंतर कालांतराने त्यांची बदली ईस्टर्न सर्कलमध्ये झाली. पहारपूर येथील उत्खननात भाग घेतला. त्यांनी १९२६ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये अध्यापन केल्यानंतर ते १९२८ साली बनारस हिंदू युनिव्हर्सिटीत दाखल झाले. त्यानंतर दोन वर्षांनी २३ मे १९३० साली त्यांचा अकाली मृत्यू झाला. (Rakhaldas Banerjee)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.