Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरावर ४४ फूट उंच धर्मध्वज फडकणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी म्हणजेच २२ जानेवारीला विजय पताका लावणार आहेत.

224
Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरावर ४४ फूट उंच धर्मध्वज फडकणार
Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरावर ४४ फूट उंच धर्मध्वज फडकणार

अयोध्येत राम मंदिरावर (Ram Mandir) १६१ फूट उंच धर्मध्वज राम मंदिरावर फडकणार आहे. त्याची उंची ४४ फूट आहे. त्यानुसार, मंदिर आणि ध्वजाची एकूण उंची २०५ फूट असेल. हा ध्वज अहमदाबाद येथून १३५० किलोमीटर दूरवरून आणण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी म्हणजेच २२ जानेवारीला विजय पताका लावणार आहेत, प्रतिष्ठापनेपर्यंत ध्वज कुठे स्थापित केला जाणार आहे, हे अद्याप ठरलेले नाही.

अंबिका इंजिनियर्स कंपनीने ७ महिन्यांत हा धर्मध्वज तयार केला आहे. ५ जानेवारीला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबाद येथून ध्वज रवाना केला होता. एका ट्रकमध्ये झेंडा घेऊन ५ जण ३ दिवसांत रामजन्मभूमीवर पोहोचले. येथे सोमवारी, पहाटे ट्रस्टच्या सदस्यांच्या हस्ते तलम धर्मध्वज सुपूर्द करण्यात आला.

(हेही वाचा – Cyber Fraud : सायबर हेल्पलाईनवर वाचवले २६ कोटी ४८ लाख)

सूर्याची किरणे प्रभू श्रीरामाच्या कपाळावर पडणार…

  • राम लल्लाच्या मूर्तीवर दूध आणि पाण्याचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही, याविषयी माहिती देताना ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, 3 कारागिरांनी भगवान श्रीरामांच्या 3 मूर्ती बनवल्या आहेत. यापैकी श्मामल मूर्तीची प्राणप्रतिष्ठेसाठी निवड करण्यात आली आहे. ही मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण दगडापासून बनवली आहे. या मूर्तीला दूध आणि पाणी अर्पण केल्याने कोणताही परिणाम होणार नाही. दरवर्षी चैत्र महिन्यात राम नवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता सूर्याची किरणे प्रभू श्रीरामाच्या कपाळावर पडतील.
  • श्रीरामाला दररोज शरयू नदीच्या पाण्याने अभिषेक घालण्याची परंपरा आहे. त्यांच्या स्नानाचे पाणी अभिषेक दर्शनावेळी भाविकांना प्रसाद म्हणून दिले जाईल. श्यामल मूर्तीच्या अभिषेकानंतर रामलल्लाला दररोज शरयू नदीच्या पाण्याने स्नान घालण्यात येईल. अंघोळीचे पाणी भाविकांना प्रसाद म्हणून दिले जाईल.
  • रामलल्ला 5 वर्षांचा श्री विष्णूचा अवतार आहे. मूर्ती पायाच्या बोटापासून कपाळापर्यंत 51 इंच उंच आहे. मूर्तीचे वजन दीड टन म्हणजेच 1500 किलो आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.