Ram Mandir : प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याकरिता ७००० किलो ‘राम हलवा’

लोखंड, तांबे आणि जहाजांकरिता वापरण्यात येणारं स्टिल या धातूंपासून ही कढई तयार केली आहे. या कढईच्या तळाशी १० फुटांचा लोखंड आणि तांब मिश्रीत पाया आहे.

258
Ram Mandir : प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याकरिता ७००० किलो 'राम हलवा'
Ram Mandir : प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याकरिता ७००० किलो 'राम हलवा'
  • नमिता वारणकर

देशभरात सध्या अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याची  चर्चा सुरू आहे. प्रभु श्रीरामाकरिता सोन्याच्या पादुका, १०८ फूट लांबीची अगरबत्ती, २१०० किलो वजनाची घंटा, दक्षिणावर्ती शंख अशा विविध अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण वस्तू श्रीरामासाठी देशभरातून पाठवल्या जात आहेत. या अलौकिक सोहळ्याकरिता तयार केला जाणारा ७००० किलोचा ‘राम हलवा’ सोशल मिडियावर ट्रेंड होत आहे. 

नागपूरचे शेफ विष्णु मनोहर यांनी २२ जानेवारीला होणाऱ्या अभिषेक सोहळ्यासाठी ‘राम हलवा’ तयार करायचे ठरवले आहे. प्रतिष्ठापनेच्या दिवशी ‘राम जन्मभूमी ट्रस्ट’च्या नावाने जागतिक विक्रम नोंदवला जाईल.

‘राम हलव्या’चे साहित्य…
७०० किलो तूप, ७०० किलो रवा, ११२० किलो साखर, १७५० लिटर दूध, १७५० लिटर पाणी (मिनरल वॉटर), २१ किलो वेलची पावडर, २१ किलो जायफळ पावडर, ११६२ डझन केळी, ५० किलो तुळशीची पानं, ३०० किलो काजू-किसमिस अशा प्रकारे एकूण ७२७४ किलोंचा राम हलवा तयार केला जाईल. याकरिता नागपुरातील वेगळा स्वाद असलेला रवा, तर तिरुपती येथील तूप वापरले जाईल. राम लल्लाला नैवेद्य दाखवल्यानंतर दीड लाख भक्तांना हा प्रसाद वाटला जाणार आहे.

(हेही वाचा  – Girish Mahajan: लोकसभेची एकतरी जागा जिंकून दाखवावी, गिरीश महाजनांचे उद्धव ठाकरेंना आव्हान )

कार सेवा से पाक सेवा तक…
या अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेमागे काय भावना आहे, असे विचारल्यावर शेफ विष्णु मनोहर सांगतात, ७००० किलो प्रसाद तयार करण्याच्या संकल्पनेमागची भावना हिच आहे की, मी काही वर्षांपूर्वी कारसेवक म्हणून अयोध्येला गेलो होतो. त्यानंतर २२ जानेवारीला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा साजरा होणार, हे जेव्हा विजयादशमीच्या दिवशी घोषित केलं तेव्हा आपल्या हातून सत्कर्म घडायला पाहिजे, असा विचार मनात आला. म्हणून मोहन भागवत यांच्याकडे राम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याकरिता ‘शिरा’ करण्याचा विचार बोलून दाखवला. अशा प्रकारे कार सेवेनंतर शिरा बनवण्यापर्यंत सुरू झालेल्या प्रवासाला ‘कार सेवा से पाक सेवा तक’ असे नाव दिले.

राम हलवा आणि हनुमान कढई
प्रतिष्ठापना सोहळ्याच्या दिवशी तयार केल्या जाणाऱ्या प्रसादाचे नाव ‘राम हलवा’ आणि हा प्रसाद ज्या वैशिष्ट्यपूर्ण कढईत तयार केला जाणार आहे, त्या कढईला ‘हनुमान कढई’, असे नाव दिले आहे, याचे कारण म्हणजे या कढईचे वजन १३०० ते १४०० किलो आहे. १५ हजार लिटर पाणी त्यात राहू शकतं. १० फूट बाय १० फूट आकाराची ही कढई आहे. कढईवरील झाकणाचं वजन १८० किलो आहे. लोखंड, तांबे आणि जहाजांकरिता वापरण्यात येणारं स्टिल या धातूंपासून ही कढई तयार केली आहे. या कढईच्या तळाशी १० फुटांचा लोखंड आणि तांब मिश्रीत पाया आहे. त्यानंतर जे स्टिल वापरलं आहे त्याला ‘सर्जिकल स्टिल’, असं म्हणतात. या स्टीलपासून डॅम गेट किंवा जहाजांची निर्मिती केली जाते. तांबं उष्णता धरून ठेवतं म्हणून कढई तयार करताना तांब्याचा वापर केला आहे. कढई ठेवण्यासाठी लागणाऱ्या स्टँडचं वजन ३५० किलो आहे. याशिवाय भव्य हनुमान कढईचा व्यास १५ फूट असून त्याची खोली ४ फूट आहे. कढईचे वजन १८०० किलो आहे.

कढईची शोभायात्रा
– महाप्रसादासाठी तयार केलेली विशेष ‘हनुमान कढई’ अयोध्येला नेण्यासाठी २ दिवसांचा कालावधी लागेल. त्यापूर्वी तिची शोभायात्रा काढण्यात येईल.
– कढई अयोध्येला नेण्यासाठी मोठा ट्रक किंवा ट्रेलर वापरला जाईल.
– कढई उचलण्यासाठी क्रेनचा वापर केला जाईल.
– भव्य कढईत तयार होणारा ७००० किलो शिऱ्याचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ श्रीराम मंदिर न्यासाकडून शेफ विष्णू मनोहर यांच्या नावे नोंदवला जाणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.