अयोध्येहून आलेल्या अक्षता कलाशांची ठिकठिकाणी उत्साहात मिरवणूक काढण्यात येत आहे. अक्षता कलश, श्रीरामाच्या प्रतिमेसह भव्य शोभायात्रा (Ram Mandir) काढून प्रभू श्रीरामाचा गजर ठिकठिकाणी होत असलेला पाहायला मिळत आहे. लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचाही या मिरवणुकीला प्रतिसाद लाभत आहे.
गावातील परिसर प्रभु श्रीरामचंद्राच्या जयघोषाने दुमदुमून जात आहे. उंडणागावातही अशाच प्रकारे अक्षता कलशांची मिरवणूक काढण्यात आली. राम मंदिरापासून पाटील गल्ली, बाजार पट्टा, महादेव चौक, बालाजी मंदिर, लाल चौक, अहिल्यादेवी होळ चौक, वीर सावरकर चौक येथे ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करून रात्री साडेआठ वाजता आरती करून राम मंदिरात शोभायात्रेची सांगता झाली. यावेळी अक्षता कलशाचे विधिवत पूजन करून मंदिरापासून मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी रथामध्ये अक्षता कलशासह प्रभू श्रीरामाची भव्य प्रतिमा लावण्यात आली होती. मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिलांनी पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. या महिलांनी घरोघरी जाऊन २२ तारखेला प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापना सोहळा कार्यक्रमाचे आमंत्रण आणि गावात उत्सव साजरा करायचा याविषयी माहिती दिली.
(हेही वाचा – Eknath Shinde: दावोस दौऱ्यात महाराष्ट्राचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय पूर्ण होणार – मुख्यमंत्री)
मिरवणुकीची शोभा वाढली…
मुखी रामनामाचा जयघोष, भगव्या टोप्या, हाती भगवे झेंडे यामुळे मिरवणुकीची शोभा वाढली. कलशधारी चिमुकल्या कुमारिका, सुवासिनी याही उत्साहाने मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. याशिवाय सर्व घरांसमोर सडारांगोळीची काढली होती. गावातील प्रमुख मार्गावरून भक्तिमय वातावरणात सायंकाळी मंगल वाद्ये आणि रामनामाचा जयघोष करत ही शोभायात्रा झाली. यावेळी पोलिसांचाही चोख बंदोबस्त सर्वत्र ठेवण्यात आला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community