अयोध्येतील (ayodhya) राम मंदिराच्या (Ram Mandir) प्रतिष्ठापनेचा दिवस जवळ येऊ लागला आहे. जगभरात हा सोहळा म्हणजे चर्चेचा विषय आहे. प्रत्येकालाच याविषयी प्रचंड उत्सुकता आहे शिवाय प्रत्येक जण आपआपल्या परीने राम मंदिर सोहळ्याला हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये अमेरिकेतील नागरिकही मागे नाहीत.
अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी न्यू जर्सी येथील एडिसन परिसरात कार रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत 350 पेक्षा जास्त कारचालकांनी सहभाग घेतला होता. अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त खास ही कार रॅली अमेरिकेतील रस्त्यांवरून काढण्यात आली. यावेळी ‘जय श्रीराम! जय जय श्रीराम!!’ , अशा घोषणाही त्यांनी दिल्या. यावेळी रॅलीतील चारचाकी वाहनांना झेंडुच्या फुलांच्या माळा लावण्यात आल्या होत्या. वाहनांवर भगव्या रंगाचे झेंडे लावले होते.
Indian-Americans organise rally of over 350 cars in Edison in New Jersey, raise ‘Jai Shri Ram’ chants ahead of consecration ceremony of Ram Mandir in Ayodhya pic.twitter.com/q7T4grsXG5
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) January 14, 2024
अशा प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त काढलेली ही कार रॅली येथील नागरिकांचा चर्चेचा विषय ठरली. या रॅलीचा व्हिडियो सोशल मिडिया “X” वर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडियो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडियोला १७३ व्ह्यूज असून १२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community