अयोध्येत प्रभु श्रीरामाचे जल्लोषात स्वागत करून राम मंदिरात राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratistha) करण्यात आली. संपूर्ण देश राममय झाला असून देशभरात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, झारखंडमधील मंदिरे फुलांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आली आहेत. या राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी लाखो दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत.
(हेही वाचा – Ayodhya Raam Mandir: श्रीराम मंदिरात स्थापन होणार सोन्याच्या पादुका, वाचा वैशिष्ट्यपूर्ण माहिती… )
उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ धाममध्ये राम दरबाराची भव्य झांकी लावण्यात आली. जम्मूतील रघुनाथ मंदिरात मोठ्या संख्येने भाविक जमले. त्यांनी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहिले. जम्मूच्या उधमपूरमध्ये तरुणांनी सर्वात उंच मंदिरावर चढून रामध्वज फडकावला.
मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरात भस्म आरतीच्या वेळी दीपावलीसारखी पूजा करण्यात आली. ओरछा येथील राम राजा सरकार मंदिरात ५१०० मातीचे दिवे प्रज्वलित करण्यात आले. राजस्थानातील जैसलमेरमध्ये पाकिस्तान सीमेजवळ जय श्रीरामाचा नाद घुमत आहे. येथे बीएसएफचे जवान तनोट माता मंदिरात रामायण पठण करत आहेत. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे महिलांनी हातावर ‘राम’ नावाची मेंदी काढली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community