Ram Mandir Pranpratistha: अयोध्येत ऋग्वेद ऋचांनी यज्ञविधींना सुरुवात, रत्नागिरीच्या वेदमूर्ती हेमंत मोघे गुरुजींसह ११ ब्रह्मवृंद निमंत्रित

सर्व विधी कृष्णयजुर्वेदीय पद्धतीनुसार होणार आहेत. ४ वेदांपैकी पहिला ऋग्वेद हा ब्रह्मदेवाच्या ४ मुखांपैकी पूर्वेकडील मुखातून प्रकट झाला होता, असे मानले जाते. त्यामुळे श्रौत आणि स्मृती या दोन्ही विधींमध्ये ऋग्वेद मंत्रांनीच देवतांचे प्रथम आवाहन केले जाते.

208
Ram Mandir Pranpratistha: अयोध्येत ऋग्वेद ऋचांनी यज्ञविधींना सुरुवात, रत्नागिरीच्या वेदमूर्ती हेमंत मोघे गुरुजींसह ११ ब्रह्मवृंद निमंत्रित
Ram Mandir Pranpratistha: अयोध्येत ऋग्वेद ऋचांनी यज्ञविधींना सुरुवात, रत्नागिरीच्या वेदमूर्ती हेमंत मोघे गुरुजींसह ११ ब्रह्मवृंद निमंत्रित

अयोध्येतील (Ram Mandir Pranpratistha) राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यातील विविध विधींना प्रारंभ झाला असून रविवारी, २१ जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी नवकुंडी यज्ञाला सुरुवात झाली. मूळचे रत्नागिरी लांजा येथील वेदमूर्ती हेमंत गजानन मोघे गुरुजींच्या नेतृत्वाखालील ११ ब्रह्मवृंदांनी ऋग्वेद ऋचा म्हटल्या.

अयोध्येतील श्रीराम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा सुरू आहे. तेथील सर्व विधी कृष्णयजुर्वेदीय पद्धतीनुसार होणार आहेत. ४ वेदांपैकी पहिला ऋग्वेद हा ब्रह्मदेवाच्या ४ मुखांपैकी पूर्वेकडील मुखातून प्रकट झाला होता, असे मानले जाते. त्यामुळे श्रौत आणि स्मृती या दोन्ही विधींमध्ये ऋग्वेद मंत्रांनीच देवतांचे प्रथम आवाहन केले जाते. दशरथ राजाने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाचा प्रारंभही ऋग्वेदातील मंत्रांसह करण्यात आला होता.

(हेही वाचा – Maryada Purushottam Din : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिन “मर्यादा पुरुषोत्तम दिन” घोषित करा; हिंदू महासभेची राज्यपालांकडे मागणी )

या मंत्रोच्चारांसाठी मोघे गुरुजींच्या नेतृत्वाखाली देशभरातील ११ ब्रह्मवृंदांना निमंत्रित करण्यात आले आहे. मोघे हे मूळचे कोलधे (ता. लांजा) येथील रहिवासी असून त्यांचे पूर्वज गुजरातमधील बडोदा येथील गायकवाड संस्थानात स्थायिक झाले. तेथेच वेदमूर्ती हेमंत मोघे यांचा जन्म १९५९ साली बडोदा येथे झाला. त्यानंतर शालेय शिक्षण आणि त्याचबरोबर स्मार्त याज्ञिक असा दुहेरी अभ्यास करून मार्च १९७६ मध्ये जुनी अकरावी एसएससी झाल्यानंतर त्यांनी स्मार्त याज्ञिकदेखील पूर्णत्वास नेण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्यांनी वेदमूर्ती भट गुरुजी (पावसनजीक मावळंगे), वेदमूर्ती पाध्ये गुरुजी (कोलधे), बडोदा येथील वेदमूर्ती पित्रे गुरुजी यांचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी वाराणशीला जाण्याचा निर्णय घेतला.

राममूर्ती प्राणप्रतिष्ठपनापूर्वीच्या नवकुंडी यज्ञाचा प्रारंभ
लक्ष्मण शास्त्री द्रविड, शंकराचार्य चंद्रशेखर सरस्वती यांच्या मार्गदर्शनाने तेथे १९२१ साली साकारलेल्या श्री वल्लभराम शालिग्राम सांगवेद विद्यालयात ते दाखल झाले. तेथे वेदमूर्ती पुणतांबेकर गुरुजी यांच्याकडे त्यांनी ऋग्वेद संहितेचे अध्ययन पूर्ण केले. त्यानंतर गेली वीस वर्षे ते ऋग्वेदाचे अध्यापक आहेत. ते सहा महिने बडोद्यात, तर सहा महिने वाराणसी येथे जाऊन अध्यापन करतात. तेथील कृष्ण यजुर्वेदीय गणेशशास्त्री यांना अयोध्येत ऋग्वेद मंत्रोच्चारांसाठी प्रमुख म्हणून पाचारण करण्यात आले होते. ती जबाबदारी त्यांनी हेमंत मोघे गुरुजींकडे सोपविली. त्यानुसार, ते अयोध्येला रवाना झाले. रविवारी, सकाळी त्यांच्या नेतृत्वाखालील देशभरातील ११ ब्रह्मवृंदांनी म्हटलेल्या ऋग्वेद मंत्रोच्चारांनी राममूर्ती प्राणप्रतिष्ठपनापूर्वीच्या नवकुंडी यज्ञाचा प्रारंभ झाला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.