अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. ऐतिहासिक आणि अलौकिक अशा या सोहळ्यानंतर नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या उभारणीत योगदान देणाऱ्या श्रमजीवींची भेट घेतली. यावेळी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. (Ram Mandir Pranpratistha)
पंतप्रधानांच्या या कृतीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच राम मंदिर परिसरात जटायूच्या मूर्तीवरही पुष्पवृष्टी करण्यात आली. अयोध्या धाममध्ये भगवान शंकराची पूजाही केली तसेच कार्यक्रमाला आलेल्या विविध व्यक्तिंना भेटून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.
(हेही वाचा – DCM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला कारसेवकांचा सत्कार )
त्रेतायुगात प्रभु रामाच्या आगमनानंतर रामराज्य स्थापन झाले. हजारो वर्षे ते आम्हाला मार्ग दाखवत राहिले. आता अयोध्येची भूमी आम्हाला प्रश्न विचारत आहे, शतकांची प्रतीक्षा संपली आहे, आता पुढे काय? असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले. पुढे त्यांनी सांगितले की, ‘काळाचे चक्र’ आता बदलत आहे. आमच्या पुढच्या पिढीला ही संधी मिळाल्याने धन्य आहे.
लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून पुष्पवृ्ष्टी
‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यादरम्यान लष्कराच्या हेलिकॉप्टरने जन्मभूमी मंदिरावर पुष्पवृष्टी केली. यासोबतच अयोध्येत उत्सवाचे वातावरण असून लोक भगवान रामाचे स्मरण करत नाचताना, गाताना आणि भजनाचा गजर करताना दिसले. सायंकाळी शरयू तिरावर दिपोत्सव करण्यात आला.
हेही पहा –