Ram Mandir – विकसित भारताचा सुवर्णसोपान

अनेक देशातील राजमार्गांवर टाळ-मृदुंगांच्या तालात हिंदूंसह स्थानिकही रामनामाचा गजर करत आनंदाने नाचत आहेत. हा रामाचा महिमा आहे.

230
Ram Mandir - विकसित भारताचा सुवर्णसोपान
Ram Mandir - विकसित भारताचा सुवर्णसोपान
  • अनिल पाटील

रामनामाच्या लाटांची गाज गल्ली ते दिल्ली गाजत आहे. इतकेच काय तर विदेशातील हिंदूंनाही नवचैतन्य प्राप्त झाले आहे. अनेक देशातील राजमार्गांवर टाळ-मृदुंगांच्या तालात हिंदूंसह स्थानिकही रामनामाचा गजर करत आनंदाने नाचत आहेत. हा रामाचा महिमा आहे. याचे कारण राममंदिराची (Ram Mandir) स्वप्नपूर्ती, तीही पाचशे वर्षांच्या काळरात्रीत प्रत्येक हिंदू मनाने सतत जगवलेले, जागवलेले सोनेरी स्वप्न! त्या महान स्वप्नाची पूर्तता होण्याचा अमृतक्षण या अमृतकाळात आलेला आहे.

समर्पण निधीला प्रतिसाद
आम्ही तीन वर्षांपूर्वी विश्व हिंदू परिषद आणि संघ यांच्यातर्फे समर्पण निधीसाठी लाखो घरांत संपर्क केला. एरवी अगदी फटकून वागणाऱ्या महाभागांनी धो-धो समर्पण हसत हसत दिले. अत्यंत गरीबांनी कडेसरीत अडीअडचणीसाठी ठेवलेल्या मळक्या नोटा आनंदाने दिल्या.
जनसामान्यांचा रामलल्ला
आतादेखील आम्ही विश्व हिंदू परिषद आणि संघाचे प्रतिनिधी राममंदिराचे आमंत्रण आणि अभिमंत्रित अक्षता देत घरोघरी जात आहोत. आम्ही रोज संध्याकाळी एकत्र जमतो. आम्ही प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आमंत्रण, अक्षता, राममंदिराचे चित्र घरोघरी देतो. सगळी इमारत, वस्ती ‘जय श्रीराम’च्या गडगडाटी जयघोषाने दुमदुमते. जे कन्याकुमारीला होत आहे, तेच काश्मिरातही होत आहे, हे महान आश्चर्य आहे.

समाजातील अभिजन डॉक्टर, व्यावसायिक, उच्चशिक्षित, उच्चपदस्थ देखील उत्साहाने रस्त्यावर उतरत आहेत. बहुजन त्यांच्या खांद्याला खांदा लावून नाचत आहेत. एकत्र श्रमपरिहार करत आहेत.

(हेही वाचा – Chandrapur: चंद्रपुरात ‘सियावर रामचंद्र की जय’ या दीपाक्षरांची विश्वविक्रमाला गवसणी !)

भर रस्त्यात भगवा हातात घेऊन ‘सनातन धर्म की जय’, ‘गर्वसे कहो हम हिंदू है’ असे नारे निस्संकोचपणे दिले जात आहेत.
आता बालगोपाळही आनंदाने रामायण बघत आहेत, तसे शोज केले जात आहेत. रामायणावर आधारित प्रश्नमंजुषा तयार आहेत. लाखो बालक, युवक परीक्षा देत आहेत.

या सर्व गोष्टींमुळे स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेला स्वाभिमानी आणि स्वत:च्या सुप्त सामर्थ्याचे भान आलेला भारतीय हिंदू नागरिक तयार होत आहे. जणू एखाद्या भिंगातून सूर्याची शक्ती एका बिंदूवर केंद्रित व्हावी, तद्वत सारी हिंदूशक्ती एक सूर्यबिंदू झाली आहे. याचा अनुभव आणि धसका अनेक खोडसाळ देशांनी घेतला आहे. आपल्या या भारत राष्ट्राला परम वैभवाप्रत नेण्यास हे पुरेसे नाही. त्याला आणखी खूप काही करावे लागेल, याची जाणीव सध्याच्या अनेक महारथी असलेल्या सरकारला आहे. त्या विकसित, परमवैभवी भारतराष्ट्राकडे कूच करण्यासाठी अत्यंत अनुकूल वातावरण या राममंदिरामुळेच (Ram Mandir) तयार झाले आहे, यात जराही शंका नाही.

राममंदिर (Ram Mandir) हा या देशाला विकसित भारताकडे नेणारा सुवर्णसोपान आहे, हे निश्चित! लेखाचा शेवट सध्या भारतभर गाजणा-या अज्ञात कवीच्या समयोचित कवितेने करणे आनंददायक होईल!

श्री रघुवरजी के अवधपुरीमे प्राण प्रतिष्ठा होनी है |
निमंत्रण को स्विकार करो सबको अयोध्या चलना है |
जय श्रीराम | जय जय श्रीराम ||

(लेखक एच आर कन्सलटन्ट आणि कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.