Ram Singh Kuka: भारतीय स्वातंत्र्य योद्धे आणि कुका उठावाचे प्रणेते ‘रामसिंह कुका’

441
Ram Singh Kuka: भारतीय स्वातंत्र्य योद्धे आणि कुका उठावाचे प्रणेते 'रामसिंह कुका'
Ram Singh Kuka: भारतीय स्वातंत्र्य योद्धे आणि कुका उठावाचे प्रणेते 'रामसिंह कुका'

बाबा रामसिंह कुका हे भारतीय स्वातंत्र्य योद्धा आणि कुकांच्या (Ram Singh Kuka) उठावाचे प्रणेते होते. त्याचबरोबर शिखांच्या कुका अथवा नामधारी पंथाचे संस्थापक होते. असहकार आंदोलनाची नोंद महात्मा गांधींच्या नावावर असली तरी रामसिंह यांनी सहकाराची सुरुवात केली होती. कुका उठावाद्वारे त्यांनी इंग्रजांना नामोहरण करुन सोडले.

रामसिंह कुका यांचा जन्म १८१६ मध्ये लुधियानाच्या भैनी या गावात झाला. ते काही काळ महाराजा रणजित सिंह यांच्या सैन्यात होते. मात्र नंतर ते गावी येऊन शेती करू लागले. ते आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. गावात ते प्रवचन द्यायचे. हळूहळू लोक जमू लागले. त्यांचे शिष्य निर्माण होऊ लागले. मग त्यांचा स्वतःचा संप्रदाय स्थापन झाला. त्यास नामधारी किंवा कुका संप्रदाय असे म्हणतात.

(हेही वाचा – Prakash Ambedkar : इंडिया आघाडी शिल्लक राहिलेली नाही; प्रकाश आंबेडकरांचे थेट वक्तव्य )

रामसिंह यांनी अनेक सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. जसे की गोरक्षण, स्वदेशी, स्त्रीमुक्ती चळवळ, आंतरजातीय विवाह, सामूहिक विवाह… त्यांनी ब्रिटिश राजवटीवर बहिष्कार टाकला आणि स्वतःची स्वतंत्र टपाल आणि प्रशासकीय यंत्रणा चालवली. दरवर्षी मकर संक्रांतीला भैणी गावात जत्रा भरायची. १८७२ मध्ये, एका जत्रेला जात असताना, त्यांच्या एका शिष्याला मुस्लिमांनी घेरले. त्यांनी त्याला मारहाण केली, गायीची कत्तल केली आणि मांश तोंडात कोण्बले. हे ऐकून गुरु रामसिंहांचे इतर शिष्य संतापले. त्यांनी त्या गावावर हल्ला केला, पण इंग्रज सैन्य पलीकडून आले. त्यामुळे युद्ध होऊ शकले नाही.

मात्र या संघर्षामुळे अनेक कुका हुतात्मा झाले. काहींना इंग्रजांनी पकडले. त्यांच्यापैकी काही तोफेच्या तोंडी देण्यात आले आणि काहींना फाशी दिली गेली. रामसिंह कुका यांना पकडून ब्रह्मदेशाच्या तुरुंगात डांबण्यात आले आणि तिथे त्यांचा शेवट झाला. मात्र त्यांच्या शिष्यांनुसार ते अजूनही जिवीत आहेत आणि ते पुन्हा येतील आणि आपल्या पंथाचा उद्धार करतील, अशी त्यांची श्रद्धा आहे.

(हेही वाचा – Krishna Chalisa : कृष्ण चालिसा वाचून भाविकांना होतो असा लाभ)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.