
एकेकाळी रामानंद सागर (Ramanand Sagar) हे सर्वांच्याच ओठांवर होते. रामायण (Ramayana) या मालिकेमुळे ते घराघरांत पोहोचले होते. रामानंद सागर यांचा जन्म २९ डिसेंबर १९१७ रोजी लाहोरजवळ असल गुरू नावाच्या ठिकाणी झाला. त्यांचे कुटुंब मुळातच श्रीमंत होते. ते त्यांच्या आजीकडे लहानाचे मोठे झाले. त्यांचे नाव चंद्रमौली होते; पण आजीने त्यांचे नाव बदलून रामानंद ठेवले.
ट्रक क्लिनर आणि शिपाई म्हणून काम करून पूर्ण केले शिक्षण
लहानपणापासूनच त्यांना कल कलेकडे होता. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांची गद्य कविता श्रीनगरच्या प्रताप कॉलेजच्या मासिकात प्रकाशित झाली होती. त्यांनी हुंडा घेण्यास विरोध केल्याने त्यांना घरातून हाकलून देण्यात आले. आता त्यांच्या खर्या आयुष्याला सुरुवात झाली होती. शिकत असतांनाच त्यांनी ट्रक क्लिनर आणि शिपाई म्हणून नोकरी केली. दिवसा काम आणि रात्री शिक्षण असा त्यांचा दिनक्रम होता.
त्यांना पंजाब विद्यापिठांतून सुवर्ण पदक मिळाले होते आणि फारसी भाषेवर त्यांचं प्रभुत्व असल्यामुळे त्यांना मुंशी फजल अशी पदवी देण्यात आली होती. सुरुवातील पत्रकार म्हणून त्यांनी (Ramanand Sagar) आपल्या करिअरची सुरुवात केली. पुढे आपल्या हुशारीवर त्यांनी वृत्तसंपादक हे पद भूषवले. त्याचबरोबर ते लेखन देखिल करत होते.
(हेही वाचा – iPhone 15 Price Cut : काय आहेत आयफोन १५ च्या नवीन किमती? कुठल्या बँका देतायत ऑफर?)
रसिकांच्या मनात घर निर्माण करणाऱ्या लोकप्रिय मालिका
रामानंद सागर (Ramanand Sagar) यांनी २२ लघुकथा, तीन दीर्घ लघुकथा, दोन कथा मालिका आणि दोन नाटके लिहिली. नंतर त्यांनी अनेक चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांसाठी पटकथा लिहिल्या. त्यांनी काही चित्रपट आणि अनेक दूरदर्शन कार्यक्रम आणि मालिकांचे दिग्दर्शन केले आणि निर्मिती देखील केली. विक्रम और बेताल (Vikram and Betal), दादा-दादी की कहानी (Dada Dadi Ki Kahaniyan), रामायण (Ramayana), कृष्णा (Krishna), अलिफ लैला (Alif Laila) आणि जय गंगा मैया (Jai Ganga Maiya) इत्यादी लोकप्रिय मालिका देऊन त्यांनी रसिकांच्या मनात घर निर्माण केलं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community