अशोक कुमार बंकर (ashok bunker) हे लेखक आणि पटकथा लेखक आहेत. त्यांनी क्राईम थ्रिलर, निबंध, साहित्यिक टीका, काल्पनिक कथा आणि पौराणिक कथा लिहून साहित्यविश्व व्यापून टाकलं आहे. त्यांनी रामायणावर ८ खंड लिहिले आहेत, त्यामुळे त्यांना पुष्कळ प्रसिद्धी लाभली. विशेष म्हणजे त्यांची ही पुस्तके बेस्ट-सेलर ठरली आणि जागतिक स्तरावर त्यांना किर्ती प्राप्त झाली. त्यांच्या पुस्तकांच्या जवळजवळ २ दशलक्ष प्रती खपल्या आहेत.
अशोक बंकर यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९६४ रोजी मुंबईत झाला. त्यांचे संगोपन त्यांची आजी मे एग्नेस स्मिथ यांनी केले. त्यांच्या आजीने त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आर्थिक मदत केली होती. हे पुस्तक त्यांनी वयाच्या १५ वर्षी लिहिले आणि या पुस्तकाचे नाव होते, ’ॲशेस इन द डस्ट ऑफ टाइम’ हा काव्यसंग्रह होता.
(हेही वाचा – Matunga Car Parking : माटुंग्यातील त्या वाहनतळाची जागा बदलणार का? रुईयासह पोद्दार कॉलेजमधील विद्यार्थ्यांची होणार गैरसोय)
विशेष म्हणजे ’एपिक इंडिया लायब्ररी’मध्ये त्यांनी भारतीय उपखंडातील सर्व पौराणिक कथा, दंतकथ आणि इतिहास ७० हून अधिक खंडात प्रकाशित केले आहेत. त्यांनी लिहिलेल्या तीन कादंबऱ्यांमध्ये त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचा अनुभव आढळतो.
व्हर्टिगो, बायकॅला बॉय आणि ब्युटीफुल अग्ली ह्या त्यांच्या कादंबर्या खूप गाजल्या तसेच गॉड्स ऑफ वॉर सारख्या सायन्स फिक्शन कथाही त्यांनी लिहिल्या. त्यांचे साहित्य टिव्ही आणि चित्रपटांमधून देखील प्रदर्शित झाले आहे. त्यांनी कवितादेखील लिहिल्या आहेत. त्यांनी द टाइम्स ऑफ इंडिया आणि आउटलूक मॅगझिन्ससारख्या नियतकालिकांमधून लेखनही केले आहे.
Join Our WhatsApp Community