Ramesh Parekh : गुजराती कवी आणि गीतकार रमेश पारेख

245
Ramesh Parekh : गुजराती कवी आणि गीतकार रमेश पारेख
Ramesh Parekh : गुजराती कवी आणि गीतकार रमेश पारेख

रमेश पारेख (Ramesh Parekh) यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९४० रोजी अमरेली येथे मोहनलाल आणि नर्मदाबेन यांच्या यांच्या घरी झाला. त्यांनी पारेख मेहता विद्यालयातून शिक्षण घेतले. ‘प्रेतनी दुनिया’ ही त्यांची पहिली कथा शाळेत असतानाच चांदनी या कथा मासिकात प्रकाशित झाली होती.

१९५८ मध्ये त्यांनी प्रथम श्रेणीसह एस.एस.सी. पूर्ण केली. त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यांना चित्रकलेची आवड होती आणि त्यांना सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घ्यायचा होता, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी हा विचार बदलला. १९६० मध्ये ते अमरेली जिल्हा कार्यालयात रुजू झाले.

(हेही वाचा-Unseasonal Rain: राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचा सल्ला

रमेश पारेख १९६२ पर्यंत कथा लिहित होते. त्यांनी मॉरल म्युझिक क्लबची स्थापना केली. त्यांनी १९६७ मध्ये कविता लिहायला सुरुवात केली. त्यांच्या कविता साहित्यिक मासिकांतून प्रसिद्ध होऊ लागल्या. १९८८ मध्ये ते सरकारी सेवेतून निवृत्त झाले आणि त्यांनी आपले जीवन साहित्यासाठी वाहून घेतले.

रमेश पारेख (Ramesh Parekh) यांनी अनेक प्रसिद्ध गाणी लिहिली आहेत. त्याचबरोबर गझलांमध्ये देखील त्यांनी मोठे योगदान दिले होते. विशेष म्हणजे त्यांनी मीराबाईंवर अनेक गीते रचली आहेत. त्यांनी गुजराती बाल साहित्य देखील लिहिले आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. १७ मे २००६ रोजी राजकोट येथे त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.